लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) न्यूझीलंडकडून (New Zealand) आठ विकेट्सने पराभूत झाला आणि जगातील पहिला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन (WTC) होण्यापासून थोडक्यात राहिला. या पराभवानंतर आता भारतीय संघ पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी आपली पहिली कसोटी मालिका इंग्लंडच्या भूमितच इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या सामन्यांपूर्वी भारतीय संघ सुट्टीवर विश्रांती घेण्यासाठी म्हणून सुट्टीवर होता. आता ही सुट्टी संपवून भारताचे खेळाडू कसोटी सामन्यांसाठी सज्ज झाले आहेत. मात्र या सामन्यांपूर्वी खेळाडूंना कोरोना चाचणी अनिवार्य असल्याने खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियाची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. (Before Playing Test series Against England Indian Cricketers need to do Covid 19 Testing)
भारतीय संघातील खेळाडूंनी कोरोनावरील लशीचा पहिला डोस भारतात घेऊन इंग्लंडला रवाना झाले होते. त्यानंतर इंग्लंडमध्ये खेळाडूंना दुसरा डोस 7 आणि 9 जुलैला देण्यात आला. क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्विसेसच्या मदतीने खेळाडूंना दुसरा डोस देण्यात आला होता. खेळाडूंना दुसरा डोस मिळाल्यानंतर लगेचच खेळाडूंची कोरोना चाचणी सुरु करण्यात आली आहे. खेळाडूंच्या कुटुंबियाची कोरोना चाचणी करण्यासही सुरुवात झाली आहे.
भारतीय खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यापूर्वीच इंग्लंड क्रिकेट संघात कोरोनाने शिरकाव केला. इंग्लंड संघातील 3 खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील 4 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेत इंग्लंड क्रिकेट बोर्डाने संपूर्णपणे फिट असणाऱ्या खेळाडूंचा संघ सामने खेळण्यासाठी उतरवला.
इंग्लंडच्या राष्ट्रीय संघासोबतच स्थानिक काउंटी क्रिकेटमध्येही कोरोनाच्या काही केसेस समोर आल्या आहेत. डर्बिशर संघात कोरोनाबाधित खेळाडू आढळल्याने सोमवारचा त्यांचा एसेक्स विरुद्धचा सामना रद्द करण्यात आला. त्याआधी एकदिवस केंट काउंटी संघातही कोरोनारुग्ण आढळला होता.
हे ही वाचा :
BREAKING: 1983 विश्वचषकाचे हिरो यशपाल शर्मा कालवश, ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
(Before Playing Test series Against England Indian Cricketers need to do Covid 19 Testing)