डरहम : इंग्लंड (England) काउंटी टीम (County Team) आणि भारतीय क्रिकेट संघ यांच्यात आज सराव सामना खेळवला जाणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटूंमध्ये आपआपसांतच मैदानावर सरावादरम्यान चुरशीचा सामना पाहायला मिळाला. संघातील खेळाडू दोेन गटात विखुरले गेले ज्यात एका गटात विराट (Virat) आणि रोहित (Rohit) तर दुसऱ्या गटात अश्विन (Ashwin) आणि पुजारा (Pujara) हे नेतृत्त्व करत होते. दोन्ही गटांनी एकमेंकाना टक्कर देत सराव केला. हा सराव भारतीय खेळाडूंच क्षेत्ररक्षण मजबूत करण्यासाठी घेण्यात आला होता. फील्डिंग कोच आर. श्रीधर (R. Sridhar) यांनी हा सराव घडवून आणला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात सर्व खेळाडू सरावादरम्यान या फील्डिंगच्या विशेष स्पर्धेत भाग घेत आहेत. फील्डिंग कोच आर. श्रीधर यांच्यामते फील्डिंगच्या या सरावामुळे खेळाडूंची फील्डींग प्रॅक्टीसतर होईलच पण सोबतच फिटनेसही चांगला राहिल.
Two squads ??
Fielding drills ?A run-through #TeamIndia‘s fun drill, courtesy fielding coach @coach_rsridhar ahead of their practice session ? – by @RajalArora #ENGvIND pic.twitter.com/NXZ4LI0aPR
— BCCI (@BCCI) July 19, 2021
व्हिडीओमध्ये आर. श्रीधर या संपूर्ण सरावाबद्दल सांगतात. ते म्हणतात, ”संपूर्ण संघाला दोन गटात वाटण्यात आलं. एकात विराट, रोहित आणि दुसऱ्यात अश्विन, पुजारासारखे खेळाडू. या संपूर्ण सरावानंतर अखेर स्कोर बोर्ड पाहिला तर विराट-रोहित यांचा पगडा भारी होता. ते अश्विन- पुजाराच्या टीमपासून 10-8 ने पुढे होते.”
As #TeamIndia regroup in Durham, @mayankcricket gives a behind-the-scenes tour, with @cheteshwar1 making a cameo ? ?- by @RajalArora
Watch the full video ? ? #ENGvINDhttps://t.co/PxtcdyhJMf pic.twitter.com/iMpNkpyPy0
— BCCI (@BCCI) July 18, 2021
पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट
दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट
तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट
चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर
पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.
हे ही वाचा
India vs Sri Lanka, 2nd ODI live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?
भारतीय संघावर कोरोनाचा घाला, पंत पाठोपाठ आणखी एकाला कोरोनाची बाधा, तर तिघेजण विलगीकरणात
IND vs ENG : दिलासादायक! ऋषभ पंतचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, लवकरच टीम इंडियात पुनरागमन
(Before Practice match at durham team india is busy in Fun fielding game video Shared By BCCI)