बर्मिगहॅम : कसोटी क्रिकेटमधील वर्ल्ड कप समजला जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला (WTC Final) 18 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. सामन्यापूर्वीच न्यूझीलंडच्या (New Zealand) खेळाडूंनी इंग्लंडविरोधात सराव कसोटी सामन्यात धडाकेबाज प्रदर्शन करुन भारताला जणू चेतावनीच दिली आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजानी इंग्लंडविरोधात अप्रतिम कामगिरी करत कसोटी क्रिकेटमधील एक अनोखा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. (Before WTC Final New Zealand three Batsmans Scored 80 runs And Done Unique Record In Test Cricket history)
इंग्लंडच्या बर्मिगहॅम येथील एजबेस्टन मैदानात न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सराव कसोटी सुरु आहे. दरम्यान यावेळी न्यूझीलंडच्या तीन फलंदाजानी पहिल्याच डावात 80 हून अधिक धावा करत एक नवा रेकॉर्ड तयार केला आहे. एकाच डावात संघाचे तीन फलंदाज 80 ते 89 च्या दरम्यान धावा करुन बाद होणे, हे टेस्ट क्रिकेटमध्ये सहाव्यांदा झाले आहे. मात्र एका डावात दूसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमाकांचे फलंदाज 80 ते 89 च्या दरम्यान धावा केल्या आहेत, हे पहिल्यांदाच झाले आहे. त्यामुळे हा एक नवा रेकॉर्ड असून यातून न्यूझीलंडचे फलंदाज कमालीच्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे.
ही कामगिरी कऱणाऱ्य तिन्ही फलंदाजामध्ये डेवन कॉनवे (Devon Conway) ज्याने 12 चौकारांसह 80 धावा केल्या आणि विल यंग (Will Young) ज्याने 11 चौकारांसह 82 धावा केल्या हे दोघेही नवखे खेळाडू आहेत. तर इंग्लंडचा सर्वात अनुभवी फलंदाज रॉस टेलरने (Ross Taylor) 11 चौकारांच्या मदतीने 80 धावा केल्या आहेत. त्यामुळे या रेकॉर्डमध्ये न्यूझीलंडच्या नवख्या खेळाडूंसह दिग्गजाचे ही योगदान आहे.
हे ही वाचा :
या अंपायरने अंपायरींग केली की टीम इंडिया मॅच हरतेच, WTC फायनलसाठी ICC कडून ‘या’ अंपायरची घोषणा!
WTC Final : ‘हे’ दोन खेळाडू करु शकतात कमाल, माजी भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी
(Before WTC Final New Zealand three Batsmans Scored 80 runs And Done Unique Record In Test Cricket history)