मुंबई: टी20 क्रिकेट म्हणजे धमाकेदार फलंदाजी हे गणितच आहे. या प्रकारात फलंदाजांमध्ये जणू षटकार ठोकण्याची शर्यतचं लागते. दरम्यान यामध्ये जगातील अनेक दिग्गज फलंदाज असून एक नाव मागील काही दिवसांत हळूहळू मोठं होत आहे. आतापर्यंत ख्रिस (Chris Gayle), आंद्रे रस्सेल (Andre Russell), ग्लेन मॅक्सवेल (G Maxwell) या धाकड खेळाडूंचा जलवा सर्वाधिक असतो. पण आका यामध्ये अवघ्या 24 वर्षाच्या खेळाडूचं नाव समोर येत आहे. ते म्हणजे न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips). या युवा खेळाडूने यंदाच्या वर्षभरात सर्वाधिक षटकार ठोकले असून यामागे व्यायामाची कमाल असल्याचं स्पष्ट केलं आहे.
ग्लेन फिलिप्स एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलताना म्हणाला, ”व्यायाम करण्यामुळे मला षटकार ठोकण्याची ताकद मिळाली. माझ्यामते जिममधील माझी मेहनत आणि क्रिकेटचं ज्ञान यामुळेच माझा खेळ चांला होत आहे. कारण ताकदीबरोबर लाईन आणि लेंथची समज असल्यासचं षटकार ठोकण्यात यश येतं.”
2021 या वर्षात ग्लेन फिलिप्सने आतपर्यंत सर्वाधिक 89 षटकार ठोकले आहेत. त्याने 48 सामन्यात 9 अर्धशतक ठोकताना हे षटकार उडवले. फिलिप्सच्या पाठोपाठ इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टन असून त्याने 38 सामन्यातील 37 डावांत 82 षटकार ठोकले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर एविन लुईस असून त्याने 29 सामन्यात 75 षटकार ठोकले आहेत.
दरम्यान ग्लेनने दिग्गज खेळाडू रस्सेल, गेल, मॅक्सवेलला यंदा मागे टाकलं आहे. रस्सेलने आतापर्यंत 50, गेलने 41 आणि मॅक्सवेलने 35 षटकारचं लगावले आहेत. दरम्यान आयपीएलच्या पर्वात ग्लेनला अधिक संधी मिळाली नसून तो खास कामगिरी करु शकला नाही. जोफ्रा आर्चरच्या बदली घेण्यात आलेल्या ग्लेनने राजस्थान रॉयल्सकडून 3 सामने खेळताना 2 षटकार ठोकले आहेत.
हे ही वाचा-
IPL 2021: धोनी, पंत, मॉर्गन की कोहली, कोण आहे नंबर-1, गौतम गंभीरचा ‘या’ कर्णधारावर विश्वास
IPL 2021: सहवागच्या स्टाईलमध्ये धोनीने फिनिश केली मॅच, दिल्लीला नमवल्यानंतर सांगितली स्ट्रॅटेजी
(Behind Glenn phillips Power hitting sixes its his Gym work out)