लाहोर: पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये पहिला कसोटी सामना रावळपिंडीमध्ये 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. पाकिस्तानसाठी ही टेस्ट सीरीज खास आहे. कारण इंग्लंडची टीम 17 वर्षानंतर क्रिकेटच्या एका मोठ्या फॉर्मेटमध्ये खेळण्यासाठी त्यांच्या देशात आली आहे. या टेस्ट सीरीजमध्ये विजेता कोण ठरणार? ते येणाऱ्या दिवसात समजेलच. पण इंग्लंडच्या कॅप्टनने पाकिस्तानी जनतेच मन जिंकलय. बेन स्टोक्सने एक निर्णय घेतलाय, त्याच सर्वत्र कौतुक होतय.
बेन स्टोक्सने टि्वटमध्ये काय लिहिलय?
पाकिस्तानात टेस्ट सीरीज खेळण्यासाठी मॅच फी म्हणून एकही पैसा घेणार नाही, असं स्टोक्सने सोमवारी जाहीर केलं. “या टेस्ट सीरीजमध्ये खेळण्यासाठी मला मिळणारी मॅच फी, मी पाकिस्तानातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहे. मी पहिल्यांदा पाकिस्तानात आलोय. ही एक ऐतिहासिक सीरीज आहे” असं बेन स्टोक्सने टि्वटमध्ये लिहिलय.
बेन स्टोक्सने मन जिंकलं
“ऐतिहासिक टेस्ट सीरीज खेळण्यासाठी पाकिस्तानात येऊन भरपूर आनंद होतोय. आमच्या टीमसाठी 17 वर्षानंतर पाकिस्तानात येणं रोमांचक आहे. यावर्षी पुरामुळे पाकिस्तानात मोठं नुकसान झालय. हे पाहून दु:ख झालं. क्रिकेटने मला आयुष्यात भरपूर काही दिलय. परत काही करण्याची हीच योग्य वेळ आहे, असं मला वाटतं. मी माझ्या टेस्ट सीरीजची सगळी मॅच फी पाकिस्तानातील पूरग्रस्तांच्या निधीला देणार आहे. पाकिस्तानातील पूरग्रस्तांना यामुळे थोडा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे” असं बेन स्टोक्सने टि्वटमध्ये म्हटलय.
इंग्लंडचा हा प्लेयर पहिली कसोटी नाही खेळणार
पाकिस्तान विरुद्धच्या टेस्ट सीरीजआधी इंग्लंडला झटका बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड रावळपिंडी कसोटीत खेळणार नाहीय. मार्क वुड अनफिट असल्याची माहिती इंग्लंडचे हेड कोच ब्रँडन मॅक्क्लम यांनी दिली. सीरीजच्या शेवटच्या दोन कसोटीत मार्क वुड खेळण्याची शक्यता आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 9 डिसेंबरला सुरुवात होणार आहे. 17 डिसेंबरला मालिकेतील अखेरचा कसोटी सामना होईल.