लंडन : क्रिकेटचा मोठा इतिहास आहे. क्रिकेटच्या मैदानात अनेक घडामोडी घडत असतात. फलंदाज, गोलंदाज, फिल्डर अनेकदा लाजवाब खेळाच प्रदर्शन दाखवतात. काहीवेळा फलंदाज रेकॉर्ड बनवतात. गोलंदाज विकेट काढून आपलं कौशल्य दाखवात, तर फिल्डर आपल्या फिल्डिंगने थक्क करुन सोडतात. क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. क्रिकेटच्या मैदानात अनेकदा फिल्डरकडून थरारक झेल पकडले जातात. या कॅचेस पाहिल्यानंतर डोळ्यावर विश्वास बसत नाही.
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या T20 लीग Vitality Blast मध्ये अशीच एक कॅच पकडली गेली आहे. ही कॅच पाहून अद्भूत, अविश्वसनीय असेच शब्द तोंडात येतात.
कुठल्या मॅचमध्ये अविश्वनसीय कॅचची स्क्रिप्ट लिहिली?
Vitality Blast टुर्नामेंटमध्ये पकडलेली ही कॅच क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कॅच ठरु शकते. पाहणाऱ्यांचा डोळ्यावर विश्वास नाही बसणार, अशी ही कॅच आहे. T20 ब्लास्ट टुर्नामेंटमध्ये ससेक्स आणि हॅम्पशायर मॅचमध्ये या अविश्वनसीय कॅचची स्क्रिप्ट लिहिली गेली.
कोणी पकडली ही कॅच?
या कॅचला ‘बेस्ट कॅच ऑफ ऑल टाइम’ म्हटलं जातय. 24 वर्षांचा स्कॉटलंडचा खेळाडू ब्रॅड करीने ही कॅच पकडली. इंग्लंडचा 34 वर्षांचा फलंदाज बेनी हॉवेलने मारलेल्या जोरदार शॉटवर ब्रॅडने ही कॅच पकडली. टिमल मिल्सच्या गोलंदाजीवर ही कॅच पकडलीय
अशी पकडली कॅच
मिल्सच्या चेंडूवर बेनी हॉवेल्सने शॉट मारला. चेंडू थेट बाऊंड्री लाइनच्या पार जाणार होता. त्याचवेळी ब्रॅड करीने हवेत झेप घेऊन जबरदस्त कॅच पकडली. ज्याने कोणी ही कॅच पाहिली, त्यांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसला नाही.
कॅचवर फॅन्सच्या रिएक्शन काय?
ही आतापर्यंतची बेस्ट कॅच आहे का? या व्हिडिओवर वेगवेगळ्या रिएक्शन आल्या आहेत. या कॅचला स्पेशल अवॉर्ड मिळालं पाहिजे, असं काही जणांच मत आहे. यापेक्षा अप्रतिम कॅच पाहिली नाही, असं काही जणांच म्हणणं आहे.
STOP WHAT YOU ARE DOING
BRAD CURRIE HAS JUST TAKEN THE BEST CATCH OF ALL TIME ?#Blast23 pic.twitter.com/9tQTYmWxWI
— Vitality Blast (@VitalityBlast) June 16, 2023
कॅच घेणारा प्लेयर ऑफ द मॅच
ही कॅच क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम आहे की नाही? यावर ठोस काही सांगता येऊ शकत नाही. पण कॅच पकडणारा ब्रॅड करी प्लेयर ऑफ द मॅच ठरला. ससेक्सने हॅम्पशायर विरुद्धची ही मॅच जिंकली. करी हीरो बनला. त्याने फक्त कॅचच पकडली नाही, त्याने 3 विकेट सुद्धा घेतले. ससेक्सने करीच्या 4 ओव्हरमध्ये 27 धावा देऊन 3 विकेट काढले.