नागपूर : विराट कोहली, टीम इंडियाचा स्टार बॅट्समन. जितका चांगला फलंदाज त्यापेक्षा कित्येक पट उत्तम फिल्डर. मात्र विराटने नागपूरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच मोठी घोडचूक केली. टीम इंडियाला विराटची ही चूक महागात पडली असती. मात्र वेळीच विराटकडून झालेली चूक रवींद्र जडेजा याने सुधारली, ज्यामुळे टीम इंडियाची वाढत असलेली डोकेदुखी थांबली. विराटने नक्की मैदानात काय केलं, हे आपण जाणून घेऊयात.
विराटने ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज स्टीव्हन स्मिथ याचा कॅच सोडला. स्टीव्ह तेव्हा अवघ्या 6 धावांवर खेळत होता. स्टीव्हनचा कॅच सोडल्यानंतर विराटने नेटकऱ्यांनी सडकून ट्रोल केलं.
हा सर्व प्रकार सामन्यातील 15 व्या ओव्हरमध्ये घडला. अक्षर पटेल बॉलिंग करत होता. अक्षरने टाकलेला बॉलवर स्टीव्हनच्या बॉलला कट लागला. कट लागून बॉल स्लीपच्या दिशेने गेला. तिथे विराट होता. मात्र विराटकडून ती कॅच सटकली आणि स्टीव्हनला जीवनदान मिळालं. ही कॅच सोपी नव्हती. कारण कट लागल्यावर बॉल स्लीपच्या दिशेने वेगात गेला. मात्र स्लीपला असलेल्या फिल्डरला कायम तयार राहयला हवं. पण विराट तितका सतर्क नव्हता.
विराटने कॅच सोडली
Virat Kohli dropped catch of Smith#ViratKohli #SteveSmith pic.twitter.com/PCIh2SGbzk
— Nitin Varshney (@NitinVa90573455) February 9, 2023
विराटने सोडलेला कॅच टीम इंडियाला महागात पडताना दिसत होता. कारण कॅच सोडल्यापासून ते पुढे स्टीव्हनने 31 धावा केल्या. म्हणजेच स्टीव्हन 37 धावांवर खेळत होता. तेव्हाच रवींद्र जडेजाने स्टीव्हनचा काटा काढला. जडेजाने स्टीव्हनला क्लीन बोल्ड केलं.
त्यामुळे विराटची एक चूक टीम इंडियाला 31 धावांनी महागात पडली. पण त्यानंतर जडेजाने स्टीव्हनचा गेम केल्याने पुढचा धोका टळला.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादव आणि केएस भरत या दोघांनी पदार्पण केलं आहे. सूर्यकुमार टीम इंडियाकडून तिन्ही फॉर्मेटमध्ये वयाच्या तिशीनंतर पदार्पण करणारा खेळाडू ठरला आहे.
टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.