कोलंबो : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना सुरु असून या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय संघालाच प्रथम गोलंदाजी करावी लागत आहे. दरम्यान भारताचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) सामन्यात सुरुवातीला गोलंदाजीची मदार सांभाळली. यावेळी विकेट तर सोडा पण त्याचाच एक मोठा रेकॉर्ड त्याच्या एका छोट्या चूकीमुळे तुटला. सामन्यातील पाचवी ओव्हर टाकत असताना भुवीने चूकून नोबॉल टाकला. या नो ब़ॉलमुळे मागील सहा वर्षे वनडे क्रिकेटमध्ये एकही नोबॉल न टाकण्याचा भुवीचा रेकॉर्ड तुटला.
भुवीने याआधी ऑक्टोबर, 2015 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये शेवटचा नोबॉल टाकला होता. त्यानंतर त्याने कधी बोलिंगची सीमारेषा पार न करता उत्तम अशी बोलिंग केली होती. भुवनेश्वर कुमारने वनडे क्रिकेटमध्ये सलग 515.6 ओव्हर म्हणजेच 3 हजार 93 चेंडू विना नोबॉल टाकता टाकले आहेत.
भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये नोबॉल न टाकता सर्वाधिक ओव्हर टाकण्याचा रेकॉर्डही भुवनेश्वर कुमार याच्याच नावावर आहे. त्याने तब्बल 1 हजार 34 चेंडू म्हणजेच 172 ओव्हर एकही नोबॉल न टाकता फेकल्या आहेत. त्याच्यानंतर युवा खेळाडू वॉशिंगटन यानेही आतापर्यंत 621 चेंडू फेकले असून त्यात एकही नोबॉल टाकलेला नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वरला एकही विकेट मिळाला नाही. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर उपकर्णधार असणाऱ्या भुवीवर अधिक ताण आला असणार हे नक्की. त्याने आतापर्यंत भारतासाठी 21 टेस्ट, 118 वनडे आणि 48 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात टेस्टमध्ये 63, वनडेमध्ये 138 आणि टी-20 मध्ये 45 विकेट्स मिळवले आहेत. 2012 पासून भारतीय संघात असणारा भुवी मागील काही काळापासून वेगवेगळ्या दुखापतींमुळे त्रस्त आहे. त्यामुळे त्याच्या गोलंदादीवरही याचा परिणाम दिसून येत आहे.
हे ही वाचा
विराटला निवृत्तीनंतर मिळणारी ‘ही’ गोष्ट आताच मिळाली, कोहलीबाबत युवराज सिंगने केलं मोठ वक्तव्य
IND vs ENG : दिलासादायक! ऋषभ पंतचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, लवकरच टीम इंडियात पुनरागमन
(Bhuvneshwar kumar Bowles first No ball in last six years at One day Cricket in Indvs Sl 2nd ODI)