क्रिकेट मॅचमध्ये प्रत्येक खेळाडू जिंकण्यासाठी ताकद पणाला लावतो. सहकारी खेळाडूंसोबत मिळून टीम जिंकावी यासाठी प्रयत्न असतो. पण ज्यावेळी आयपीएल येतं, तेव्हा वेगवेगळ्या टीम्सकडून खेळताना हे प्लेयर आपल्याच देशाच्या खेळाडूंना भिडतात. मैदानावरची ही बाचाबाची कधीकधी खूप गंभीर असते. सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यात असच काहीस झालं. भुवनेश्वर कुमारने थेट रवींद्र जाडेजाला चेंडू मारला.
हैदराबादमध्ये शुक्रवारी 5 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये सामना झाला. हैदराबादच्या होम ग्राऊंडवर सामना असून चेन्नईला मोठा सपोर्ट होता. मात्र, तरीही चेन्नईची टीम मोठी धावसंख्या उभारु शकली नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये रवींद्र जाडेजाने वेगाने धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. पण यश मिळालं नाही. अशाच एका प्रयत्नात स्टम्पसच्या दिशेने जोरात केलेला थ्रो बसला.
जाडेजा यामुळे कळवळला
19 व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमार गोलंदाजी करत होता. जाडेजा चौथ्या चेंडूचा सामना करत होता. भुवनेश्वर कुमारने एकदम परफेक्ट यॉर्कर टाकला. ज्यावर मोठा फटका खेळण्याचा जाडेजाचा प्रयत्न फसला. चेंडू भुवनेश्वर कुमारच्या दिशेने गेला. धाव घेण्याच्या प्रयत्नात जाडेजा क्रीजच्या बाहेर आला. तितक्यात भुवनेश्वरने चेंडू उचलला व जाडेजाला रनआऊट करण्यासाठी स्टम्पसच्या दिशेने थ्रो केला. जाडेजा क्रीजच्या दिशेने पळत होता. तो चेंडूच्या लाइनमध्ये आला. चेंडू जोरात जाडेजाच्या कमरेवर लागला. जाडेजा यामुळे कळवळला.
Obstructing or not? 🤔
Skipper Pat Cummins opts not to appeal 👏👏#SRHvCSK #IPLonJioCinema #TATAIPL pic.twitter.com/l85UXQEa4S
— JioCinema (@JioCinema) April 5, 2024
त्यावरुन मोठा वाद झाला असता
सुदैवाने जाडेजाला गंभीर दुखापत झाली नाही. त्यावेळी दोन्ही अंपायर्सनी चर्चा केली. जाडेजा जाणूनबुजून चेंडू आणि स्टम्पसच्या लाइनमध्ये आला नाही ना. असं असल्यास त्याला बाद ठरवलं असतं. जाडेजा चिडल्याच दिसत होता. त्यावरुन मोठा वाद झाला असता. पण SRH चा कॅप्टन पॅट कमिन्सने अंपायर्सला सांगितलं की, तो अपील करणार नाही. त्यामुळे वाद टळला.