IND vs PAK: भुवनेश्वरने टॅलेंट दाखवलं, दुबईत चेंडूला स्विंग मिळत नव्हता, तेव्हा त्याने….

| Updated on: Aug 29, 2022 | 12:33 PM

IND vs PAK: टीम इंडियाच्या विजयाचं सर्वाधिक श्रेय हार्दिक पंड्याला (Hardik pandya) जातं. पण त्याचवेळी भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) सुद्धा या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलय.

IND vs PAK: भुवनेश्वरने टॅलेंट दाखवलं, दुबईत चेंडूला स्विंग मिळत नव्हता, तेव्हा त्याने....
भुवनेश्वर कुमार
Image Credit source: social
Follow us on

मुंबई: आशिया चषक (Asia cup) स्पर्धेत भारताने सलामीच्या सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवला. टीम इंडियाच्या विजयाचं सर्वाधिक श्रेय हार्दिक पंड्याला (Hardik pandya) जातं. पण त्याचवेळी भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) सुद्धा या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलय. त्याने फक्त पाकिस्तानचा टॉप फलंदाज बाबर आजमलाच आऊट केलं नाही, तर टिच्चून माराही केला. स्विंग गोलंदाजी ही बाबर आजमची ताकत आहे. पावरप्ले मध्ये भुवनेश्वर कुमार प्रतिस्पर्धी संघांसाठी जास्त धोकादायक आहे. आपल्या स्विंग होणाऱ्या चेंडूंनी तो सुरुवातीलाच धक्के देतो. इंग्लंड मध्ये हे दिसून आल होतं. आशिया कप स्पर्धा दुबई मध्ये होत आहे. दुबई आणि इंग्लंड मधील वातावरण बिलकुल वेगळं आहे. दुबईत उष्ण हवामान आहे. या वातावरणात चेंडूला फार स्विंग मिळत नाही.

म्हणून भुवनेश्वर कुमार उजवा गोलंदाज ठरतो

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही भुवनेश्वर कुमारला फार स्विंग मिळत नव्हता. पण त्याने अचूक टप्पा आणि दिशा यावर लक्ष केंद्रीत केलं. परिस्थितीनुसार भुवनेश्वरने आपल्या गोलंदाजी कौशल्यात बदल केला. त्यामुळे भुवनेश्वर कुमार उजवा गोलंदाज ठरतो. भुवनेश्वरने आपल्या फुल लेंग्थ चेंडूंवर पाकिस्तानी फलंदाजांना चांगलच सतावलं. खासकरुन पाकिस्तानचा दुसरा सलामीवीर रिजवानला हैराण केलं. बाबर आजमला त्याने फुल चेंडू टाकला. दुसऱ्या ओव्हर मध्ये भुवीने बाबरला आपल्या बाऊन्सर चेंडूवर पूर्णपणे चकवलं. अवघ्या 10 धावांवर त्याने बाबरला पॅव्हेलियन मध्ये पाठवलं. भुवनेश्वर कुमारने 4 ओव्हर्समध्ये 26 धावा देत 4 विकेट काढल्या.

हरभजनने काय सल्ला दिला होता?

UAE मध्ये भुवनेश्वरकुमारला स्विंग मिळणार नाही. त्याचे चेंडू स्विंग होणार नाहीत. त्यामुळे भुवनेश्वरकुमारला दिशा आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. त्यावर नियंत्रण ठेवावं लागेल, असं हरभजन सिंगने म्हटलं होतं. “जेव्हा चेंडू स्विंग होत नाही, तेव्हा गोलंदाजाने चेंडूची दिशा आणि टप्पा अचूक ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा परिस्थिती अनुकूल नसेल, तेव्हा तुम्ही तुमच्या खेळात बदल करणं आवश्यक आहे. भुवनेश्वर कुमार दोन्ही दिशेला चेंडू स्विंग करु शकतो. पण यूएई मधल्या वातावरणात चेंडूला स्विंग मिळणार नाही” असं हरभजन सिंग म्हणाला होता.