सिडनी: बिग बॅश लीगच्या 12 व्या सीजनची सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात एकाच प्लेयरने दोन जबरदस्त कॅच पकडून सगळ्यांना हैराण केलं. अशा कॅचेस पाहिल्यानंतर ‘कॅचेस विन मॅचेस’ म्हणतात, ते उगाच नाही, हे लक्षात येतं. क्रिकेटच्या मैदानात तुम्ही याआधी कदाचित अशा कॅचेस पाहिल्या असतील. एकाच सामन्यात दोन जादुई कॅच पकडणाऱ्या खेळाडूच नाव आहे, ब्रॉडी काउच. त्याने पहिली कॅच बायसिकल किकच्या अंदाजात पकडली. दुसरी कॅच पळताना हवेमध्ये पकडली. ब्रॉडी काउचने आपल्या परफॉर्मन्सने सगळ्यांचच मन जिंकून घेतलं.
कोणामध्ये होता सामना?
बिग बॅश लीगमधील पहिला सामना मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडरमध्ये खेळला गेला. या मॅचमध्ये पहिली बॅटिंग करताना मेलबर्नने 8 विकेट गमावून 122 धावा केल्या. प्रत्युत्तरात सिडनी थंडरने शेवटच्या चेंडूवर एक विकेट राखून विजय मिळवला. एक विकेटने रोमांचक विजय मिळवला.
Absolutely INSANE from Brody Couch ??? #BBL12 pic.twitter.com/GFKsXCM3GS
— KFC Big Bash League (@BBL) December 13, 2022
सब्सीट्यूट खेळाडूची कमाल
लक्ष्याचा पाठलाग करताना सिडनी थंडर्सने मॅथ्यू आणि रायली रुसो या दोन महत्त्वाच्या विकेट शुन्यावरच गमावल्या. दोन्ही विकेट ट्रेंट बोल्टने घेतल्या. यानंतर फलंदाजांनी थोडं-थोडं योगदान देऊन टीमला विजयाच्या समीप नेलं. सिडनीला मेलबर्न स्टार्सच्या गोलंदाजांनी खूपच सतावलं. मेलबर्न स्टार्सचा सब्सीट्यूट फिल्डर काउचने कमालीची कॅच पकडून सगळ्यांना हैराण केलं. त्याने पहिल्या ओव्हरमध्ये मॅथ्यूची कॅच पकडली. शॉर्ट फाइन लेगवर काउचच्या हातून कॅच सुटली होती. पण त्यानंतर बायसिकल अंदाजात चेंडूला पायाने जमिनीवर पडण्यापासून रोखलं व दोन प्रयत्नात एकाहाताने कॅच पकडली.
OH MY GOD BRODY COUCH!
WHAT AN INSANE CATCH!#BBL12 pic.twitter.com/9io2X1OqER
— 7Cricket (@7Cricket) December 13, 2022
ग्रीन पाहत बसला
काउच दुखापतग्रस्त जॉ बर्न्सच्या जागी सब्सीट्यूट खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता. या लाजवाब कॅचनंतर 20 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर ख्रिस ग्रीनचा हवेत झेल घेतला. या सामन्यातील त्याची ही दुसरी सुपर कॅच होती. ग्रीनला वाटत होतं की, त्याचा हा शॉट बाऊंड्री पार जाईल. पण काउचने पळत हवेत डाइव्ह मारुन जबरदस्त कॅच पकडली. ही कॅच पाहून ग्रीनही हैराण झाला. तो काउचकडे पाहत बसला, त्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला.