T20 विश्वचषकानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) मोठी स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. पुढल्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. यामध्ये आठ देश सहभागी होणार आहेत. पण यंदा या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. मात्र टीम इंडियाने पाकिस्तानला जाणार नकार दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका अधिकाऱ्याने म्हटले की, दुबई आणि श्रीलंकेत याचे आयोजन करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी टीम इंडियाने आशिया चषकासाठी पाकिस्तानला न जाण्याचा निर्णय घेतला होता. मैदान गमावण्याच्या भीतीने पाकिस्तानचे दिग्गज आता उघडपणे पुढे आले आहेत.
वसीम अक्रम एका मुलाखतीत म्हणाला की,“मला आशा आहे की भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येईल. आपला देश यजमानपदासाठी सज्ज आहे. आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करू. क्रिकेटही छान होईल. आमच्या इथे खूप चांगल्या सुविधा आहेत. नवीन स्टेडियमही बांधले जात आहेत. पीसीबी अध्यक्षांनी यासाठी कसरत सुरू केली आहे. कराची आणि इस्लामाबादच्या स्टेडियमला नवीन रूप दिले जात आहे.
वसीम अक्रम म्हणाला की, “क्रिकेटच्या सुधारणेसाठी पाकिस्तानला या स्पर्धेची गरज आहे. मला आशा आहे की जगभरातील संघ येथे सहभागी होतील. क्रिकेट आणि राजकारण वेगळे असले पाहिजे. पाकिस्तान या स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार आहे.’
बीसीसीआयने मागणी केली तर त्याचा नक्कीच आयसीसीकडून विचार होऊ शकतो. आयसीसीमध्ये बीसीसीआयचा मोठा दबदबा आहे. किस्तानमध्ये भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे बीसीसीआय ही जोखीम घेणार आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जायचे की नाही याचा निर्णय बीसीसीआयच्या पुढील बैठकीत होणार आहे.
𝐈𝐀𝐍𝐒 𝐄𝐱𝐜𝐥𝐮𝐬𝐢𝐯𝐞
Watch: Former seamer Wasim Akram ‘hopes’ Indian team will travel to Pakistan for 2025 Champions Trophy pic.twitter.com/5B09C7JCUQ
— IANS (@ians_india) July 11, 2024
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जे आठ संघ पात्र ठरले आहेत त्यामध्ये पाकिस्तान, भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गद्दाफी स्टेडियम लाहोर, रावळपिंडी आणि नॅशनल स्टेडियम कराचीची निवड करण्यात आली आहे. 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान याचे आयोजन केले जाऊ शकते असे सांगितले जात आहे. सुरुवात 19 फेब्रुवारीला पाकिस्तान आणि न्यूझीलंड सामन्याने होईल. भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे. पाकिस्तानसोबतचा ‘महामुकाबला’ 1 मार्चला होणार आहे.