मुंबई: T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये झालेला पराभव भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल घडवणार आहे. इंग्लंडकडून 10 विकेटने झालेला पराभव भारतीय क्रिकेटप्रेमींच्या जिव्हारी लागला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डानेही सेमीफायनलमधील पराभवाला गांभीर्याने घेतलं आहे. BCCI भारतीय क्रिकेटमध्ये काही अमूलाग्र बदल घडवण्याच्या विचारात आहे. लवकरच व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळे कॅप्टन दिसू शकतात.
बदल काय होणार?
व्हाइट बॉल क्रिकेट म्हणजे वनडे आणि टी 20 साठी सेप्रेट कॅप्टन. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय. मायदेशात जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्ध सीरीज होणार आहे. याच मालिकेपासून भारतीय क्रिकेटमध्ये बदलाची अमलबजावणी सुरु होईल. जानेवारी महिन्यात श्रीलंके विरुद्ध तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. या सीरीजसाठी दोन वेगवेगळे कॅप्टन दिसतील. रोहित शर्मा वनडे टीमच नेतृत्व करणार आहे. हार्दिक पंड्या टी 20 क्रिकेट टीमचा कॅप्टन असेल.
बीसीसीआय अधिकाऱ्याने काय माहिती दिली?
“आताच वृत्ताला दुजोरा देणं थोडं घाईच ठरेल. पण वनडे आणि टी 20 टीमसाठी सेप्रेट कॅप्टन नियुक्त करण्याचा आम्ही विचार करतोय. यामुळे एकाच माणसावरचा लोड कमी होईल. टी 20 क्रिकेटसाठी एक नवा दृष्टीकोन गरजेचा आहे. 2023 मध्ये भारतात वनडे वर्ल्ड कप आहे. त्यासाठी सातत्य सुद्धा गरजेच आहे. जानेवारीपासून योजनेवर अमलबजावणी सुरु होऊ शकते. आम्ही भेटून, या बद्दल अंतिम निर्णय घेऊ” असं टॉप बीसीसीआय अधिकाऱ्यांनी इनसाइड स्पोर्ट्ला सांगितलं.
श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजनंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध मायदेशात मालिका आहे. जानेवारीपासून हार्दिक पंड्याची टी 20 मध्ये कायमस्वरुपी कॅप्टन म्हणून नियुक्ती होऊ शकते. रोहित शर्मा वनडे आणि टेस्ट टीमचा नेतृत्व करेल.
वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंडच्या टीममध्ये फरक काय?
इंग्लंडने नुकताच टी 20 वर्ल्ड कप जिंकला. या टीमच्या टेस्ट आणि टी 20 टीमचे वेगवेगळे कॅप्टन्स आहेत. टेस्टमध्ये नेतृत्व बेन स्टोक्सकडे आहे, तर मर्यादीत षटकात जोस बटलर कॅप्टन आहे. इंग्लंडची टेस्ट आणि टी 20 टीमही वेगळी आहे. टी 20 क्रिकेटमध्ये वेग महत्त्वाचा असतो. त्या दृष्टीने टीम इंडियाला आखणी करावी लागेल. टीम इंडियाने 2007 साली पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी त्या टीममध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड नव्हते. युवा खेळाडूंच्या जोशने भरलेला हा संघ होता.