मुंबई: T20 वर्ल्ड कपसाठी आज पाकिस्तानची टीम निवडली जाणार आहे. मात्र त्याआधी एक मोठी बातमी आहे. पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू राशिद लतीफच्या हवाल्याने ही बातमी आली आहे. फखर जमांची पाकिस्तानी टीममध्ये निवड होणार नाही, असं लतीफने म्हटलं आहे. इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरीजमधून फखर जमां बाहेर होणार, असं लतीफने सांगितलं आहे.
एकत्र टीम निवडली जाणार
फखर जमांला टी 20 वर्ल्ड कप टीममधूनही डच्चू मिळू शकतो, अशी बातमी आहे. इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरीज आणि टी 20 वर्ल्ड कपसाठी एकत्रच टीम निवडली जाणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप टीममधून फखरला डच्चू मिळेल, असं म्हटलं जातय.
निवड न होण्याचं कारण काय?
T20 सीरीज आणि वर्ल्ड कपसाठी एकत्र टीम निवडली जाणार आहे. त्यामुळे फखर जमां दोन्ही टीममधून स्थान गमावू शकतो, अशी दाट शक्यता आहे. फखर जमां गुडघे दुखापतीने त्रस्त आहे. हे त्याच्या बाहेर होण्यामागचं एक कारण आहे. फखरला झालेली दुखापत किती गंभीर आहे, त्यावर त्याला सावरायला किती वेळ लागेल, ते ठरणार आहे.
खराब फॉर्मने वाढवून ठेवली होती अडचण
पाकिस्तानी टीममध्ये आपली जागा टिकवणं फखर जमांसाठी सोप नाहीय. आशिया कपमधील त्याच्या प्रदर्शनानंतर संघातील त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
आशिया कपमध्ये किती धावा केल्या?
आशिया कप 2022 मध्ये त्याने 6 सामन्यात 16 च्या सरासरीने फक्त 96 धावा केल्या. 103.22 त्याचा स्ट्राइक रेट होता. 6 सामन्यात त्याला 100 धावाही करता आल्या नाहीत. त्याने फक्त एक अर्धशतक झळकावलं. म्हणजे 6 पैकी तो 5 इनिंगमध्ये अपयशी ठरला.