Blind Cricket World Cup 2022 : दृष्टीहीन T20 विश्वचषकात बांगलादेशचा पराभव करत भारतीय संघाने तिसऱ्यांना या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टा सगळीकडूनच टीम इंडियावर अभिनंदन आणि कोतूकाचा वर्षाव होत आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने बांगलादेशला 278 धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ केवळ 157 धावाच करू शकला. भारतीय संघातील सलामीवीर सुनील रमेशने 63 चेंडूत नाबाद 136 धावा ठोकल्या तर कर्णधार एके रेड्डीने 50 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या.
या वर्ल्डकपमध्ये 6 देशांचे संघ सहभागी झाले होते. व्हिसा न मिळाल्यामुळे पाकिस्तान संघाला सहभागी होता आले नाही. 5 डिसेंबरपासून ही स्पर्धा सुरू होती. भारतीय संघाने तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर आपलं नाव कोरलंय.ही स्पर्धा 2012 मध्ये पहिल्यांदा सुरू झाली होती. ज्यामध्ये फक्त भारतच विजेता ठरला आहे.
#TeamIndia beat Bangladesh by 120 runs & clinched the 3rd #T20WorldCup 2022 pic.twitter.com/Vod0x13fzx
— Doordarshan Sports (@ddsportschannel) December 17, 2022
2017 मध्येही टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत करून विजेती ठरली होती आणि आता 2022 मध्येही भारताने बांगलादेशला हरवून या मालिकेचे जेतेपद पटकावले आहे. सोशल मीडियावर लोकांमध्ये आनंदाची लाट आहे. प्रत्येकजण आनंद व्यक्त करत आहे.