Blind Cricket World Cup 2022 : टीम इंडियाने काल T20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. टीम इंडियाने दृष्टीहीन T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये शेजारच्या बांग्लादेशचा पराभव केला. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 277 धावांचा डोंगर उभारला. प्रतिस्पर्धी बांग्लादेशला विजयासाठी 278 धावांच लक्ष्य दिलं होतं. पण बांग्लादेशच्या टीमला फक्त 157 धावा करता आल्या.
किती धावांनी मॅच जिंकली?
टीम इंडियाच्या या विजयावर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतोय. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर फायनल झाली. टीम इंडियाने 120 धावांनी सामना जिंकून वर्ल्ड कपवर नाव कोरलं. टीम इंडियाने फक्त 2 विकेट गमावून 277 धावांचा डोंगर उभारला होता. बांग्लादेशची टीम निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 3 विकेट गमावून 157 धावांच करु शकली.
यापूर्वी कधी जिंकलाय वर्ल्ड कप?
टीम इंडियाने याआधी 2012 आणि 2017 साली दृष्टीहीन T20 वर्ल्ड जिंकला आहे. आताची तिसरी वेळ आहे. भारतीय संघातील सलामीवीर सुनील रमेशने 63 चेंडूत नाबाद 136 धावा ठोकल्या तर कर्णधार एके रेड्डीने 50 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. या विजयाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताच्या दृष्टीहीन संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
शानदार व ऐतिहासिक!
भारतीय ब्लाइंड क्रिकेट टीम द्वारा तीसरी बार T20 का वर्ल्ड कप जीतने पर पूरी टीम को बहुत-बहुत बधाई।
अपने कड़े परिश्रम और हार ना मानने के जज्बे के साथ सभी खिलाड़ियों ने एक बार फिर इतिहास रचकर देश का मान बढ़ाया है। हर भारतवासी को आप पर गर्व है। pic.twitter.com/CG2TnumOdL
— Amit Shah (@AmitShah) December 17, 2022
अमित शहा काय म्हणाले?
त्यांनी हा शानदार, ऐतिहासिक विजय असल्याचं म्हटलं आहे. “भारतीय ब्लाइंड क्रिकेट टीमने तिसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला, त्याबद्दल संपूर्ण टीमला शुभेच्छा. कठोर मेहनत आणि पराभव न मानण्याची लढाऊ वृत्ती, या बळावर तुम्ही इतिहास रचला व देशाचा सन्मान वाढवला. प्रत्येक भारतीयाला तुमचा अभिमान आहे” अशा शब्दात अमित शाह यांनी भारताच्या ब्लाइंड क्रिकेट टीमचा शुभेच्छा दिल्या आहेत.