चेन्नई : टीम इंडिया येत्या रविवारी वनडे वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना खेळणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियवर ही मॅच होईल. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याने आपल्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात करणार आहे. वनडे वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्याआधीच टीम इंडियाला झटका बसलाय. टीम इंडियाच्या एका प्रमुख खेळाडूला डेंग्युची लागण झालीय. त्याचा डेंग्युचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. हा प्लेयर पहिल्या सामन्याआधी फिट होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे टीम इंडियाला आपला पहिला सामना या खेळाडू शिवाय खेळावा लागू शकतो. टीम इंडियाला वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच हा मोठा झटका आहे. हा खेळाडू गुरुवारी ट्रेनिंग सेशनमध्ये सुद्धा सहभागी झाला नाही. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. टीम मॅनेजमेंट या खेळाडूची विशेष काळजी घेतेय. हा खेळाडू ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार की, नाही? याचा निर्णय शुक्रवारी एक टेस्ट होईल, त्यानंतर घेतला जाईल.
टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिलला डेंग्युची लागण झाली आहे. शुभमन गिल टीम इंडियाचा भरवशाचा खेळाडू आहे. मागच्या काही महिन्यात त्याने वनडे आणि टी 20 मध्ये टीम इंडियासाठी सातत्याने धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत तो सलामीच्या सामन्यात खेळला नाही, तर टीम इंडियाला आपली रणनिती बदलावी लागेल. शुभमन गिल खेळणार नसेल, तर त्याच्याजागी दुसरा ओपनिंग पार्ट्नर निवडण्याच आव्हान रोहित शर्मासमोर असेल. गिलच न खेळणं ही टेन्शनची बाब आहे. कारण सध्या तो शानदार फॉर्ममध्ये आहे. गिलने अलीकडेच 24 सप्टेंबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात दमदार शतक झळकावल होतं. मोहालमीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने 74 धावा केल्या होत्या.
त्याच खेळणं टीम इंडियासाठी का महत्त्वाच?
टीम इंडिया चेन्नईमध्ये आपला पहिला सामना खेळणार आहे. ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल मानली जाते. ऑस्ट्रेलियाकडे एडम झम्पासारखा स्पिनर आहे. टीम इंडियाला अडचणीत आणण्याची या गोलंदाजाची क्षमता आहे. त्याने याआधी अनेकदा टीम इंडियाला अडचणीत सुद्धा आणलय. भारताचे काही फलंदाज स्पिन गोलंदाजी उत्तमपणे खेळतात, शुभमन गिलचा त्या फलंदाजांमध्ये समावेश होतो. त्यामुळे शुभमन गिलच चेन्नईमध्ये खेळणं टीम इंडियासाठी महत्त्वाच आहे. तो खेळला नाही, तर टीमच्या अडचणी वाढतील.