Anushka Sharma Praises Virat Kohli: विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात 166 धावांची तडाखेबंद शतकी खेळी केली. विराटच्या या इनिंगच अभिनेत्री आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने कौतुक केलं. इन्स्टाग्रामवर तिने एक फोटो शेयर केलाय. त्याने तिने ‘काय मुलगा आहे, काय इनिंह होती’ असं लिहिलय.
श्रीलंकेला दिलं डोंगराएवढ लक्ष्य
टीम इंडियाने तिसऱ्या वनडेत श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट गमावून 390 धावांचा डोंगर उभारला. या एवढ्या मोठ्या लक्ष्यासमोर श्रीलंकेचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. विराटच्या इनिंगमुळे टीम इंडियाला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली. अनुष्का शर्माने नवऱ्याच्या खेळाच विराटच कौतुक केलं. सेंच्युरी झळकवल्यानंतर विराट बॅट उंचावून अभिवादन करतो. तो फोटो अनुष्का शर्माने शेयर केलाय. ‘काय खेळाडू आहे’ असा स्टीकरही तिने या फोटोसोबत जोडलाय.
विराटच्या 166 धावा
विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात 110 चेंडूत 166 धावा फटकावल्या. त्याने तिसऱ्या वनडेमध्ये हा कारनामा केला. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. शानदार इनिंगबद्दल तिने नवऱ्याच कौतुक केलं.
अनुष्का लवकरच दिसणार या चित्रपटात
अनुष्का शर्मा अनेकदा विराटच्या चांगल्या इनिंगनंतर सोशल मीडियावर त्याचं कौतुक करते. अनुष्का शर्मा लवकरच क्रिकेटर झुलन गोस्वामीचा बायोपिक चकदा एक्स्प्रेसमध्ये दिसणार आहे. तिने अलीकडेच या चित्रपटाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ शेयर केलाय. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने 2017 मध्ये लग्न केलं. 2021 साली अनुष्काला एका सुंदर मुलीला जन्म दिला. अनुष्का शर्माने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचा अंदाज फॅन्सना विशेष आवडतो. ती सोशल मीडियावर सुद्धा सक्रीय असते.
कोहलीने किती मीटर लांब सिक्स मारला?
कोहलीने आपल्या शतकाच सेलिब्रेशन रंजिताच्या चेंडूवर हॅलिकॉप्टर शॉट मारुन केलं. त्याने जवळपास 97 मीटर लांब सिक्स मारला. या सिक्सचा व्हिडिओ व्हायरल होतोय. गौतम गंभीरने त्याच्या या शॉटच कौतुक केलं. कोहलीच्या शतकापेक्षा तो सिक्स जास्त लाजवाब होता, असं गंभीर म्हणाला. माजी भारतीय कॅप्टन सिक्स मारल्यानंतर जास्त आक्रमक झाला. त्याने 100 धावा केल्यानंतर आणखी 7 सिक्स मारले.