मुंबई: चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये (CSK vs KKR) आयपीएलचा (IPL) पहिला सामना सुरु आहे. कोलकाताच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन चेन्नईला जखडून ठेवलं आहे. त्यामुळेच 14 षटकात चेन्नईच्या पाच बाद 69 धावा झाल्या आहेत. गोलंदाजांबरोबर KKR चा विकेटकीपर शेल्डन जॅक्सनने (Sheldon Jackson) अप्रतिम यष्टीरक्षण केलं. सीएसकेच्या सेट झालेल्या रॉबिन उथाप्पाला ज्या पद्धतीने त्याने यष्टीचीत केलं त्याला तोड नाही. त्याआधी उमेश यादवने चेन्नईला दोन दणके दिली. ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे या दोन्ही सलामीवीरांना उमेशने स्वतस्तात माघारी पाठवलं. कॉनवेने आज आयपीएलमध्ये डेब्यु केला तर गायकवाडने मागच्या सीजनमध्ये ऑरेंज कॅप मिळवली होती.
स्टंम्प पाठीराहून जबरदस्त कामगिरी
रॉबिन उथाप्पाने चेन्नईला चांगली सुरुवात करुन दिली होती. त्याने दोन चौकार आणि दोन षटकार लगावले होते. रॉबिन उथाप्पा मोठी खेळी खेळणार असं वाटत असतानाच वरुण चक्रवर्तीच्या फिरकी गोलंदाजीवर शेल्डन जॅक्सनने स्टंम्प पाठीराहून जबरदस्त कामगिरी केली.
WICKET: ? ?. Super Kings 49/3 (7.5/20 ov, lost the toss) v KKR
Uthappa st †Jackson b Varun 28 (21)
Varun 1.5-0-15-1 pic.twitter.com/wpOzowNKHi— Cricket Master Updater (@MohsinM55415496) March 26, 2022
क्रीझबाहेर जाऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न
सामन्याच्या आठव्या षटकात जॅक्सनने ही सुंदर स्टंम्पिग घेतली. उथाप्पाने क्रीझबाहेर जाऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. खरंतर चेंडू तीन स्टंम्पसच्याही बाहेर होता. पण शेल्डन जॅक्सनने अप्रतिम विकेटकिपिंगचा नजराणा दाखवत क्षणाचाही विलंब न लावता उथाप्पाची स्टम्पिंग केली.
That was an outstanding stumping. @ShelJackson27’s speed reminded me of @msdhoni.
Lightning fast!! ⚡️#CSKvKKR
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 26, 2022
स्वत: सचिन तेंडुलकरही या स्टम्पिंगच्या प्रेमात पडला. या स्टंम्पिंगने आपल्याला एमएस धोनीची आठवण करुन दिली असं सचिनने टि्वट केलं आहे.