IND vs ENG | धर्मशाळा टेस्ट जिंकणं हे रोहित शर्माच पुढच मिशन आहे. 7 मार्चपासून या टेस्ट मॅचची सुरुवात होणार आहे. इंग्लंड विरुद्घ हा सीरीजमधील शेवटचा कसोटी सामना आहे. हा कसोटी सामना जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टॉप स्थान टिकवण्यासाठी विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. या मॅचआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माची माफी मागण्यात आली. रोहित शर्मा एअरपोर्टवर होता. तो आपल लगेज घेऊन चेक इन करत होता. त्याचवेळी काही कॅमरामन त्याचे फोटो काढू लागले. या नंतर एकजण असं काहीतरी बोलला की, रोहितच्या चेहऱ्यावरचे थोडे हाव-भाव बदलले. त्यानंतर कॅमेरामनने रोहितची माफी मागितली. रोहितने पण फॅन्सच मन जिंकण्यात कुठलीही कसूर ठेवली नाही.
कॅमेरामनने रोहितची माफी मागितल्यानंतर सोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. रोहितने त्यांना नाराज केलं नाही. त्यांच्यासोबत फोटो काढले. एअरपोर्टवर सगळेच लोक यामुळे खुश झाले. रोहित जामनगरमध्ये अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सेरेमनीला हजर होता. पत्नी रितिका सजदेह सोबत होती.
धर्मशाळा टेस्ट रोहितसाठी खास
धर्मशाळा टेस्ट रोहित शर्मासाठी खूप खास आहे. कारण रोहित या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळणार आहे. धर्मशाळामध्ये आतापर्यंत एकमेव टेस्ट मॅच झालीय. त्यात रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. रोहित कॅप्टन असून तो पहिल्यांदा या मैदानावर खेळताना दिसेल. टेस्ट सीरीजमध्ये रोहितने चांगलं प्रदर्शन केलय. राजकोट टेस्टमध्ये रोहितने शतक सुद्धा झळकवलेलं. धर्मशाळामध्ये रोहित चांगल प्रदर्शन करुन टीमला विजय मिळवून देईल अशी अपेक्षा आहे.