Ravichandran Ashwin | अश्विनची अचानक माघार, टीम इंडियाला त्याच्याजागी बदली खेळाडू मिळेल का?

| Updated on: Feb 17, 2024 | 7:51 AM

Ravichandran Ashwin | रविचंद्रन अश्विनने अचानक माघार घेतली आहे. कौटुंबिक इमर्जन्सीमुळे अश्विनला मैदान सोडाव लागलय. आज कसोटीचा तिसरा दिवस आहे. टीम इंडियाची गोलंदाजी सुरु आहे. आज अश्विनची सर्वाधिक गरज असताना त्याला घरी परताव लागलय. त्यामुळे टीम इंडियाला आता अश्विनच्या जागी बदली खेळाडू मिळेल का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Ravichandran Ashwin | अश्विनची अचानक माघार, टीम इंडियाला त्याच्याजागी बदली खेळाडू मिळेल का?
Ashwin
Image Credit source: PTI
Follow us on

IND vs ENG | राजकोटमध्ये भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु आहे. आज टेस्ट मॅचचा तिसरा दिवस आहे. पण तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्याआधीच टीम इंडियाला झटका बसला आहे. रविचंद्रन अश्विनने सामन्यातून अचानक माघार घेतली आहे. कौटुंबिक इमर्जन्सीमुळे अश्विनला घरी परताव लागलय. आर अश्विनने काल एक गडी बाद करत 500 विकेट्सचा पल्ला गाठला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा एक मोठा टप्पा आहे. अश्विन टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आहे. आज इंग्लंड विरुद्ध त्याची कमतरता प्रकर्षाने जाणवून येईल. दरम्यान आता प्रश्न निर्माण होतोय की, अश्विनच्या जागी टीम इंडिया बदली खेळाडूचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करु शकते का?.

बदली खेळाडूबाबत ICC चा नियम खूप स्पष्ट आहे. अश्विन नसताना टीम इंडियाला उर्वरित त्यांच्या चार गोलंदाजांवर अवलंबून रहाव लागेल. बदली खेळाडूबाबत आयसीसीच नियम क्लियर आहे. सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षणासाठी बदली खेळाडू वापरता येऊ शकतो. त्या शिवाय मैदानावर एखाद्या खेळाडूला गंभीर इजा झाल्यास किंवा कोविड-19 ची लागण झाल्यास प्लेइंग इलेव्हनमध्ये बदली खेळाडूचा समावेश करता येतो. अश्विनने कौटुंबिक कारणांमुळे मैदान सोडलय. त्यामुळे त्याच्या जागी बदली खेळाडू मिळणार नाही.

अश्विनने किती ओव्हर टाकलेल्या?

बदली खेळाडूला गोलंदाजीची परवानगी नसेल. अश्विनच्या कोट्याची षटक दुसऱ्या कुठल्याही गोलंदाजाला पूर्ण करता येणार नाहीत. अश्विनने दुखापतीमुळे मैदान सोडलेलं नाही किंवा त्याला कोविडची लागण झालेली नाही. भारताला फक्त मैदानावर फिल्डिंगसाठी बदली खेळाडू मिळेल. पहिल्या डावात टीम इंडियाने 445 धावा केल्या. त्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 2 गडी गमवून 207 धावा केल्या आहेत. अजूनही भारताकडे 238 धावांची आघाडी आहे. टीम इंडियाला कसोटीवर पकड मिळवण्यासाठी आज लवकरात लवकर इंग्लंडचा डाव गुंडाळावा लागेल. अश्विनने काल 7 ओव्हर्समध्ये 37 धावा देऊन एक विकेट घेतला.