एडिलेड: T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झालाय. इंग्लंडने भारतावर 10 विकेट राखून विजय मिळवला. टीम इंडिया सेमीफायनलमध्ये इतका वाईट परफॉर्मन्स करेल, याची कुणीही अपेक्षा केली नव्हती. टीम इंडियाच्या या मोठ्या पराभवामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये संताप आहे. सेमीफायनलमधून फायनल गाठण्यात टीम इंडिया पुन्हा एकदा अपयशी ठरली.
आजही सेमीफायनलमध्ये गाडी अडकली
मागच्यावेळी 2019 वनडे वर्ल्ड कपमध्येही असंच घडलं होतं. त्यावेळी सुद्धा सेमीफायनलमध्ये प्रवास संपुष्टात आला. 2016 टी 20 वर्ल्ड कपमध्येही गाडी सेमीफायनलमध्ये अडकली होती. आताही तसच घडलय. आज इंग्लंडने टीम इंडियाला पराभूत केलं. विजयासाठी 169 धावांच लक्ष्य देऊनही टीम इंडियाला एक विकेटही काढता आली नाही.
Sirf aasu bahane se kuch nahi hota jb throughout the tournament openers perform nhi krenge toh aisa toh hoga hi na
What I am trying to say @ImRo45 is more responsible for this knockout than the today’s performance of Indian bowlers#SemiFinalT20WC #Rohit pic.twitter.com/0zCqBbbzlb— Vaishnavi_Somani (@_Vaishnavi1509_) November 10, 2022
Kamiya dhundhte haii mujhme log, jese inme khuda basta ho ☺️
Chin up champ @ImRo45 the good time will come ❤️#Rohit#worldcup2023 #RohitSharma #India pic.twitter.com/UKxW3ioctg— K U N A L ⚓ (@kuna1___) November 10, 2022
त्याने ट्रोलर्सवर काहीही परिणाम नाही
सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स शेयर करुन नेटीझन्स आपल्या संतापाला वाट मोकळी करुन देतायत. टीमचा कॅप्टन रोहित शर्मा खासकरुन नेटीझन्सच्या रडारवर आहे. पराभवानंतर रोहित शर्माच्या डोळ्यात अश्रू होते. पण त्याने ट्रोलर्सवर काहीही परिणाम झालेला नाही. रोहितला त्यांनी भरपूर सुनावलय.
Rohit Sharma received Mega Masala Vadapav for his test innings throughout the T20 world cup well deserved captain ? #INDvsENG #PakvsNz #ENGvsPAK #PAKvsENG #PAKvENG #ViratKohli #BabarAzam #ENGvIND #HardikPandya #RohitSharma #TeamIndia #Rohit #BoycottIPL pic.twitter.com/Qoq4wJA1N1
— Dk (@IAM_DALE05) November 10, 2022
Management skills
Groomed DK as finisher
*Dropped*Groomed Harshal as death bowler
*Dropped*Backed Chahal as lead spinner
*Dropped*Andd the Result you got ?
Worst Management
Poor captaincy #captaincy #INDvsENG #T20WorldCup #Rohit#T20WorldCup #T20Iworldcup2022 pic.twitter.com/kas4On1lkS— Ritick Jha (@RitickJha49) November 10, 2022
हिटमॅनने कुठल्या टीमविरुद्ध किती रन्स केल्या?
चालू टी 20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने पाकिस्तान विरुद्ध 7 चेंडूत (4), नेदरलँड्स विरुद्ध 39 चेंडूत (53), दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 14 चेंडूत (15), बांग्लादेश विरुद्ध 8 चेंडूत (2), झिम्बाब्वे विरुद्ध 13 चेंडूत (15), इंग्लंड विरुद्ध 28 चेंडूत (27) धावा केल्या. रोहितने एकाही महत्त्वाच्या मॅचमध्ये मोठी इनिंग खेळला नाही. त्यामुळे कॅप्टन या नात्याने रोहितवर टीका होणं स्वाभाविक आहे.