नवी दिल्ली : भारत-वेस्ट इंडिजमध्ये दोन टेस्ट मॅचची सीरीज येत्या 12 जुलैपासून सुरु होणार आहे. 12 जुलैला वेस्ट इंडिजच्या डॉमिनिकामध्ये पहिला कसोटी सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7.30 वाजता या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग 11 निवडणं, कॅप्टन रोहित शर्मासाठी सोपं नसेल. पहिल्या कसोटी सामन्यात 3 खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर बसवलं जाऊ शकतं.
या तीन प्लेयरच वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात बेंचवर बसणं निश्चित आहे. या तिन्ही खेळाडूंचा अजिबात विचार होणार नाही.
कोणाला संधी मिळेल?
वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन स्पिन गोलंदाजी विभागाच नेतृत्व करेल. त्याला रवींद्र जाडेजा साथ देईल. या कसोटी सामन्यात तिघांना बेंचवर बसावं लागेल. पहिल्या कसोटीत हेड कोच राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्मा मोहम्मद सिराज, नवदीप सैनी आणि जयदेव उनाडकट या तिघांना संधी देतील. प्लेइंग इलेव्हनमधून वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला वगळलं जाईल.
टीम इंडियाकडून टेस्ट डेब्यु कोण करणार?
वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या कसोटीत विकेटकीपर फलंदाज केएस भरतला सुद्धा बाहेर बसवलं जाईल. इशान किशनला या कसोटीत डेब्युची संधी मिळेल. इशान किशन 7 व्या नंबरवर धुवाधार बॅटिंग करु शकतो. रोहित शर्मासाठी इशान किशन ब्रह्मास्त्र ठरु शकतो. केएस भरत विकेटकीपर आणि फलंदाज म्हणून प्रभावी ठरलेला नाही.
दोघांमध्ये प्राधान्य कोणाला?
रवींद्र जाडेजाच पहिल्या कसोटीत खेळणं निश्चित आहे. त्यामुळे डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला बाहेर बसाव लागेल. दोघेही ऑलराऊंडर आहेत. पण अनुभव आणि परफॉर्मन्स लक्षात घेता, रवींद्र जाडेजाला प्राधान्य मिळेल.
वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या कसोटीसाठी संभाव्य प्लेइंग 11
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, जयदेव उनादकट.
टेस्ट सीरीजसाठी भारतीय टीम
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जायसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जड़ेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.