भोपाळ : भारतात क्रिकेट एक लोकप्रिय खेळ आहे. संधी मिळेल तेव्हा, सर्वसामान्यांपासून नेते, अभिनेते क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतात. बुधवारी मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. त्यांनी सुद्धा बॅटिंग करण्याचा आनंद लुटला. पण या दरम्यान एक अपघात घडला. यामुळे एका भाजपा कार्यकर्त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ आली. मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया मध्य प्रदेश क्रिकेट असोशिएशनच्या नवनिर्मित स्टेडियमच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी पोहोचले होते. यावेळी बॅटिंग करताना ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मारलेल्या एका शॉटमुळे भाजपा कार्यकर्त्याला रुग्णालयात दाखल कराव लागलं.
मैदानात बॅटिंग करताना काय घडलं?
ज्योतिरादित्य सिंधिया बॅटिंग करत होते. त्यांनी एका चेंडूवर जोरात शॉट मारला. पण चेंडू एका भाजपा कार्यकर्त्याच्या डोक्यावर लागला. गंभीररित्या जखमी झालेल्या या भाजपा कार्यकर्त्याला रुग्णालयात न्याव लागलं. केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन या कार्यकर्त्याची विचारपूस केली. जखमी झालेल्या कार्यकर्त्याच नाव विकास मिश्रा आहे.
विकास मिश्रा कोण आहेत?
विकास मिश्रा हे दीनदयाल मंडलचे उपाध्यक्ष आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी फटका मारल्यानंतर विकास मिश्रा कॅच पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी चेंडू डोक्याला लागून ते जखमी झाले. त्यानंतर विकास यांना लगेच ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या ताफ्यातील कारमधून संजय गांधी स्मृती रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी विकास मिश्रावर उपचार केले. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्वत: तिथे जाऊन कार्यकर्त्याची विचारपूस केली.