Chamika Karunaratne: बॉलचा अचूक अंदाज न आल्याने खेळाडूने गमवले पुढचे दात, पण तरी कॅच पकडलीच

| Updated on: Dec 08, 2022 | 10:33 PM

क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच कोणत्या खेळाडूला कॅच पकडताना आपले ४ दात गमवावे लागले आहे.

Chamika Karunaratne: बॉलचा अचूक अंदाज न आल्याने खेळाडूने गमवले पुढचे दात, पण तरी कॅच पकडलीच
Follow us on

मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर खेळत असताना अनेकदा खेळाडूंना दुखापतीचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत अनेक जण जखमी झाले आहेत. तर काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. खेळात कधी काय होईल हे सांगता येत नाही. असंच काही श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू चमिका करुणारत्ने याच्यासोबत घडले आहे.

श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये फिल्डिंग दरम्यान कॅच पकडण्याचा प्रयत् करत असताना थोडी चूक झाली आणि बॉल थेट त्याच्या दातांवर आदळला. ज्यामुळे त्याचे पुढचे 4 दात पडले. यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

करुणारत्ने कॅंडी फाल्कन्सकडून खेळतोय. कार्लोस ब्रॅथवेटचा झेल घेण्याच्या प्रयत्नात करुणारत्ने जखमी झाला.या लीगच्या चौथ्या सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली. चेंडूचा अचूक अंदाज न आल्याने त्याचे पुढचे दात तुटले.पण तो कॅच पकडण्याच यशस्वी ठरला. करुणारत्ने याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्यांची प्रकृती ठीक आहे.

करुणारत्ने याने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.