कोलंबो: आशिय कप जिंकल्यानंतर श्रीलंकन टीमच टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर-12 राऊंडमध्ये आव्हान संपुष्टात आलं. सध्या श्रीलंकन टीम चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. खेळाडूंच्या बेशिस्तीमुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या अडचणी वाढल्या आहेत. दानुष्का गुणतिलका ऑस्ट्रेलियात बलात्काराच्या आरोपात अडकला. त्यानंतर आता चामिका करुणारत्ने अडचणीत आलाय. बोर्डाने त्याच्यावर कारवाई केलीय.
काय आहेत आरोप?
श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने 23 नोव्हेंबरला एका स्टेटमेंट जारी केलं. करुणारत्नेवर कॉन्ट्रॅक्ट नियमांच उल्लंघन केल्याचा आरोप केला व एक वर्ष बंदीची कारवाई केली. करुणारत्नेवर सध्या हे निर्बंध लागू होणार नाहीत. कारण बोर्डाने ही शिक्षा तूर्तास निलंबित केली आहे. म्हणजेच या काळात तो राष्ट्रीय टीमकडून खेळू शकतो. एक वर्षात तो पुन्हा दोषी आढळला, तर त्याच्यावर प्रतिबंध लागू होतील.
आपल्या चूका मान्य
प्रतिबंधाशिवाय करुणारत्नेला 5 हजार डॉलर्सचा दंडही ठोठावलाय. करुणारत्नेने कुठल्या नियमांच उल्लंघन केलं, ते बोर्डाने आपल्या पत्रकात स्पष्ट केलेलं नाही. ऑलराऊंडर करुणारत्नेने आपल्या चूका मान्य केल्याचं बोर्डाने सांगितलय.
करुणारत्ने 26 वर्षांचा आहे. अलीकडेच टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या टीमचा तो सदस्य आहे. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये तो अपयशी ठरला. 7 मॅचेसमध्ये त्याने फक्त 32 धावा आणि 3 विकेट एवढच योगदान दिलं.