मुंबई: चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन M.S.Dhoni क्रिकेटच नाही, त्याच्या पुढचाही विचार करतो. भारताचा कॅप्टन कुल हळूहळू बिजनेसच्या पीचवर आपली पकड मजबूत करत आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर धोनी सेंद्रीय शेतीमध्ये (Business) रमला. त्याच्या फार्ममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पिकवल्या जातात. या सर्व भाज्या बाजारात विक्रीसाठी पाठवल्या जातात. धोनी क्रिकेट बरोबरच बिझनेसमध्येही तितकाच इंटरेस्ट घेतो. धोनीने आता ड्रोन्स बनवणाऱ्या एका कंपनीत गुंतवणूक केली आहे. चेन्नईस्थित गरूड एयरोस्पेस (Garuda Aerospace) या कंपनीत धोनीने गुंतवणूक केली आहे. धोनीने नेमकी किती रक्कम गुंतवलीय ते स्पष्ट नाहीय. गरूड एयरोस्पेस ही भारतातील आघाडीची ड्रोन उत्पादक कंपनी आहे. धोनी या कंपनीत इन्वेस्टर तर आहेच, पण त्याच बरोबर तो चेहरा सुद्धा असणार आहे. धोनी या कंपनीचा ब्रँड एंबेस्डर असणार आहे.
गरूड एयरोस्पेसचें संस्थापक अग्निश्वर जयप्रकाश म्हणाले की, “एमएस धोनीने इन्वेस्टर आणि ब्रँड एंबेस्डर म्हणून सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे” “आम्हाला जे मिळवायचे आहे, धोनीचा विचारही तसाच आहे. त्याचा आमच्यावर विश्वास आहे. यापेक्षा आम्हाला चांगला भागीदार आणि एंबेस्डर नसता मिळाला. धोनी कंपनीत टप्याटप्याने गुंतवणूक करणार आहे” असं अग्निश्वर जयप्रकाश यांनी सांगितलं.
“धोनीसोबत आणखी काही गुंतवणूकदारही कंपनीत इन्वेस्ट करणार आहेत. आम्ही जुलैच्या अखेरपर्यंत 30 मिलियन डॉलर सीरीज ए राउंड बंद करतोय. पंतप्रधानांनी ड्रोन महोत्सव आयोजित केलाय. त्यानंतर लोकांचा ड्रोनमध्ये रुची वाढलीय” असं अग्निश्वर म्हणाले.
चेन्नई स्थित गरूड एयरोस्पेसची सुरुवात 2015 साली झाली होती. या कंपनीने ड्रोन स्टार्टअप इकोसिस्टिमला प्रोत्साहन दिलं. आम्ही कमी बजेटमध्ये ड्रोन बेस्ट सोल्युशन उपलब्ध करुन देणार आहोत. गरुडने बनवलेल्या ड्रोन्सचा उपयोग कोविडच्या वेळी सॅनिटायजेशनसाठी मोठ्या प्रमाणावर झाला होता. बनारस, रायपूर, चेन्नई आणि हैदराबाद सारख्या शहरात औषधांच्या डिलिव्हरीसाठी या ड्रोन्सचा उपयोग झाला.