मुंबई : चेन्नई सुपर किग्जने आयपीएलमध्ये 4 खेळाडुंना रेटेन केले आहे. त्यात धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे. पण आता लिलावात काही खास मॅचविनर खेळाडुंना परत आणण्यासाठी चेन्नईची टीम कोट्यवधी रुपये खर्च करु शकते. कारण महेंद्रसिंह धोनीला कोण मॅचविनर आणि कोणाची ताकद काय आहे, हे खूप चांगले माहित आहे. धोनी विकेटच्या मागून मॅच बदलतो असं म्हणतात. त्यामुळे त्याला हवे ते खेळाडू टीमकडून दिले जातात.
कोण आहेत ते पाच मॅचविनर?
सुरेश रैनाला मिस्टर आयपीएल म्हणून ओळखलं जातं चेन्नईसाठी खेळताना रैनाने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सुरेश रैना धोनीचा फेवरेट खेळाडू आहे. चेन्नईची नजर रैनावर नक्कीच राहणार आहे. रैनाचा मागील सीझन काही खास गेला नव्हता. तो जास्त खेळताना दिसून आला नव्हता.
2. फाफ डुप्लेसी
फाफ डुफ्लेसीला सर्वात स्फोटक ओपनर मानलं जातं. सलामीला कशी आक्रमक फलंदाजी करायची हे डुप्लेसीला चांगलं ठावूक आहे. त्यामुळे चेन्नई डुप्लेसीवर कोट्यवधी लावू शकते.
3. ड्वेन ब्रावो
ड्वेन ब्रावोही चेन्नईसाठी एक अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. ताबडतोड बॅटिंग आणि डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी ड्वेन ब्रावो करतो.
4. दीपक चाहर
चेन्नईची नजर दीपक चाहरवरही असणार आहे. कारण स्विंग बॉलिंगसाठी दीपक अत्यंत महत्वाचा खेळाडू राहिला आहे. गोलंदाजीची धुरा त्याचेकडेच असते.
5. रॉबिन उथ्थपा
रॉबिन उथ्थपालाही चेन्नई मोठी बोली लावण्यास तयार असणार आहे. कारण गेल्या वर्षी क्लालिफायरमध्ये रॉबिन उथ्थपाने बेस्ट इनिंग खेळत चेन्नईला मोठा विजय मिळवून दिला होता. आता यापैकी कोणते खेळाडू चेन्नईच्या टीममध्ये दिसणार हे लिलावानंतरच स्पष्ट होईल.