IPL 2021: आयपीएलच्या 14 व्या पर्वातील 38 वा सामना नुकताच चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळवला गेला. अगदी उत्कंठार्धक झालेला हा सामना शेवटच्या चेंडूवपर्यंत गेला. पण अखेरच्या चेंडूवर चेन्नईच्या दीपक चाहरने (Deepak Chahar) एक धाव घेत सामना चेन्नईच्या खिशात घातला. पण केकेआरच्या सुनील नारायणने (Sunil Narayan) टाकलेल्या अखेरच्या षटकाने सर्वांचेच मन जिंकले.
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील हा दुसरा डबल हेडर सामना आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि केकेआर या दोन्ही संघांनी दुसऱ्या टप्प्यातील दोन्ही सामने जिंकले आहेत. चेन्नईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या तर कोलकात्याचा संघ चौथ्या स्थानावर आहे. हा सामना जिंकून प्ले ऑफचं तिकीट मिळवण्याचं प्लॅनिंग धोनीच्या चेन्नईने केलेलं असणार आहे. तर प्लेऑफचं तिकीट मिळवण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी केकेआरसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.
केकेआरचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण मागील काही सामने उत्तम कामगिरी करणारे केकेआरचे सलामीवीर शुभमन गिल आणि व्यंकटेर अय्यर आज खास कामगिरी करु शकले नाही. गिलने 9 आणि अय्यरने 18 धावांच केल्या. ज्यानंतर राहुल त्रिपाठीने दमदार 45 धावा ठोकत डाव सावरला. त्याला नितीश राणाने (37) साथ दिली. तर अखेरच्या काही चेंडूत अनुभवी दिनेश कार्तिकने 11 चेंडूमध्ये केलेले 26 रनही केकेआरला महत्त्वाचे ठरले ज्यामुळे चेन्नईसमोर 172 धावांचे लक्ष्य होते.
केकेआरचे सलामीवीर फेल गेले असले तरी चेन्नईचे सलामीवीर मात्र चालले. सलामीवीर ऋतुराज गायकवाड (40) आणि फाफ डुप्लेसी (43) यांनी चेन्नईला उत्तम सुरुवात करुन दिली. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज अयशस्वी झाल्यानंतर 19 व्या षटकात जाडेजाने दोन षटकार आणि चौकार ठोकत चेन्नईच्या पारड्यात सामना आणून ठेवला. पण अखेरची ओव्हर सुनील नारायणने अप्रतिम टाकत दोन विकेट्सही घेतल्या. ज्यानंतर शेवटच्या एका चेंडूवर चेन्नईला एक धाव गरजेची असताना दीपक चाहरने ती घेत संघाला विजय मिळवून दिला.
WHAT. A. MATCH! ? ?
Absolute scenes in Abu Dhabi as @ChennaiIPL win the last-ball thriller against the spirited @KKRiders. ? ?#VIVOIPL #CSKvKKR
Scorecard ? https://t.co/l5Nq3WwQt1 pic.twitter.com/Q53ym5uxtI
— IndianPremierLeague (@IPL) September 26, 2021
हे ही वाचा
(Chennai super kings won Match against KKR on last ball of sunil narine over)