मुंबई: महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) आयपीएल (IPL) मध्ये एका गोलंदाजावर विश्वास ठेवला. काही सामन्यांमध्ये त्याची धुलाई झाली, तरी धोनीने त्याला संघात कायम ठेवलं. त्याला आता लॉटरी लागली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 मॅक्स स्पर्धेत खेळताना दिसेल. मुकेश चौधरीशिवाय आणखी एक डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाला सुद्धा ऑस्ट्रेलियात खेळण्याची संधी मिळाली आहे. सकारिया आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळला होता.
MRF पेस फाऊंडेशन आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया मध्ये आदान-प्रदान कार्यक्रम चालतो. त्या अंतर्गत चेतन सकारिया आणि मुकेश चौधरी ब्रिस्बेन मध्ये क्रिकेट खेळणार आहेत. MRF पेस फाऊंडेशन आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया मध्ये खेळाडूंच्या कोचिंगच आदान-प्रदान मागच्या 20 वर्षांपासून सुरु आहे. कोरोना व्हायरसमुळे मागची दोन वर्ष हे आदान-प्रदान झालं नव्हतं. पण आता ते पुन्हा सुरु झालं आहे.
सकारियाने मागच्यावर्षी श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी 20 मध्ये आंतरराष्ट्रीय डेब्यु केला होता. मुकेश चौधरीने आयपीएल 2022 मध्ये डेब्यु केला. चेन्नईकडून खेळताना या गोलंदाजाने 13 सामन्यात 16 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 टुर्नामेंट मध्ये सकारिया सनशाइन कोस्टसाठी तर मुकेश चौधरी विन्नम-मॅनली कडून खेळताना दिसतील.