Chetan sharma Resign : चेतन शर्मा यांना अखेर चीफ सिलेक्टरच पद सोडाव लागलय. माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बीसीसीआयने त्यांचा राजीनामा मंजूर केलाय. चेतन शर्मा एका स्टिंग ऑपरेशनमध्ये फसले होते. या स्टिंगमध्ये चेतन शर्मा नको तेवढं बोलून गेले, त्यामुळे त्यांची खुर्ची जाणार हे निश्चित होतं. चेतन शर्मा यांना मागच्या तीन महिन्यात दुसऱ्यांदा चीफ सिलेक्टरच पद सोडावं लागलय. T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडियाच्या खराब प्रदर्शनानंतर चेतन शर्मा यांना पदावरुन हटवण्यात आलं होतं. पण पुढच्याच महिन्यात पुन्हा त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. बीसीसीआयच्या या निर्णयावर बरीच टीका झाली होती. आता पुन्हा एकदा चेतन शर्मा यांची उचलबांगडी करण्यात आलीय.
चेतन शर्मा यांच्या चीफ सिलेक्टर पदाचा शेवट बिलकुल त्यांच्या क्रिकेट करिअरसारखा झाला. चेतन शर्मा एक चांगले वेगवान गोलंदाज होते. पण करिअर दरम्यान त्यांना तोंड लपवून आणि वेश बदलून फिरण्याची वेळ आली होती.
देशात वेशांतर करुन फिरण्याची वेळ
आता एका स्टिंगमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागलाय. ते क्रिकेट खेळायचे त्यावेळी अशीच एक घटना घडली, जी आजही क्रिकेट रसिकांच्या स्मरणात आहे. त्यामुळेच चेतन शर्मा ओळखले जायचे. फक्त एका चेंडूमुळे त्यांच्यावर देशात तोंड लपवून, वेशांतर करुन फिरण्याची वेळ आली होती. 1986 साली आशिया कपच्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या टीम आमने-सामने होत्या. पाकिस्तानला शेवटच्या बॉलवर 6 रन्सची गरज होती. चेतन शर्मा ती ओव्हर टाकत होता. जावेद मियाँदादने शर्मा यांच्या लास्ट बॉलवर सिक्स मारला. त्यानंतर चेतन शर्मा फॅन्सच्या नजरेत विलन बनले. त्यांना वेशांतर करुन देशात फिरावं लागलं.
1994 मध्ये चेतन शर्माच करिअर संपलं
चेतन शर्मा यांच्या क्रिकेट करिअरचा शेवटही खूप वाईट होता. 1994 साली देशासाठी चेतन शर्मा शेवटचा सामना खेळले होते. न्यूझीलंड विरुद्ध एका ओव्हरमध्ये त्याने 23 धावा दिल्या होत्या. स्टीफन फ्लेमिंगने एका ओव्हरमध्ये सलग पाच चौकार मारले. चेतन शर्माला मॅचमध्ये फक्त एक ओव्हर मिळाली. आता चीफ सिलेक्टर म्हणूनही त्यांच्या करिअरचा तसाच शेवट झालय.