चेतेश्वर पुजाराने दाखवलं रौद्र रुप, 75 चेंडूत ठोकलं शतकं

| Updated on: Aug 24, 2022 | 9:56 AM

रताच्या कसोटी संघाचा (Indian Test Team) महत्त्वाचा सदस्य आणि चिवट फलंदाजीसाठी ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara) वनडे क्रिकेट मध्ये आपली क्षमता दाखवतोय.

चेतेश्वर पुजाराने दाखवलं रौद्र रुप, 75 चेंडूत ठोकलं शतकं
cheteshwar pujara
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: भारताच्या कसोटी संघाचा (Indian Test Team) महत्त्वाचा सदस्य आणि चिवट फलंदाजीसाठी ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara) वनडे क्रिकेट मध्ये आपली क्षमता दाखवतोय. पुजारा सध्या इंग्लंडच्या रॉयल लंडन कप (Royal london cup) स्पर्धेत खेळतोय. या स्पर्धेत सरेकडून खेळताना मिडिलसेक्स विरुद्ध त्याने शानदार शतक झळकावलं. पुजाराने फक्त 75 चेंडूत सेंच्युरी ठोकली. त्याने 90 चेंडूत एकूण 132 धावा केल्या. या दरम्यान त्याने 20 चौकार आणि दोन षटकार लगावले. पुजाराचं या टुर्नामेंट मधील हे तिसरं शतक आहे. पाचव्या सामन्यात तिसऱ्यांदा तो शतक झळकवण्यात यशस्वी ठरला. याआधी 14 ऑगस्टला त्याने सरे विरुद्ध 174 धावांची इनिंग खेळली होती. याआधी 12 ऑगस्टला वॉरकशायर विरुद्ध 107 धावा केल्या होत्या.

टॉम सोबत शतकी भागीदारी

पुजाराने या सामन्यात सलामीवीर टॉम एस्लोप सोबत शतकी भागीदारी केली. टॉम अली सोबत सलामीला आला होता. पण तो जास्त वेळ खेळपट्टिवर टिकू शकला नाही. तो 20 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर टॉम क्लार्कही मैदानावर जास्त वेळ टिकू शकला नाही. तो सुद्धा 9 धावा करुन आऊट झाला. हे दोघे बाद झाल्यानंतर पुजारा मैदानात आला. पुजाराने स्थिती सावरली व टॉम सोबत डाव पुढे नेला. संघाची धावसंख्या 95 असताना दोघांची भागीदारी सुरु झाली होती. इथून दोघे संघाची धावसंख्या 335 पर्यंत घेऊन गेले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 261 धावांची भागीदारी केली. पुजाराला मॅक्स हॅरिसने आऊट केलं. 45 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तो आऊट झाला.

टॉम नाबाद राहिला

पुजाराच्या बाद होण्याचा टॉमवर परिणाम झाला नाही. त्याने आपला खेळ सुरु ठेवला व आक्रमक फलंदाजी कायम ठेवली. टॉमने नाबाद 189 धावा केल्या. आपल्या डावात त्याने 155 चेंडूंचा सामना केला. या दरम्यान टॉमने 19 चौकार आणि 5 षटकार मारले. पुजारानंतर डेलरे रॉवलिंस आठ चेंडूत 14 धावा करुन आऊट झाला. ओलिवर कार्टर सात चेंडूत 11 धावांवर नाबाद राहिला. मिडिलसेक्सकडून मॅक्स हॅरिसने तीन विकेट घेतल्या.