लंडन: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून फॉर्मसाठी संघर्ष करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar pujara) काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये अखेर सूर गवसला आहे. त्याने शनिवारी सलग चौथ शतक झळकावलं. पूजाराच्या या सेंच्युरीमध्ये 13 चौकार आणि दोन षटकार होते. मजबूत अशा मिडलसेक्स (Middlesex) संघाविरुद्ध अवघ्या 133 चेंडूत त्याने हे शतक झळकावलं. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी मिडलसेक्स संघाकडून खेळतो. शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर सुद्धा पुजाराने चांगली फटकेबाजी केली. चेतेश्वर पुजारा काऊंटीमधील ससेक्स संघाकडून खेळतोय. ससेक्सच्या (Sussex) दुसऱ्या डावात तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने शाहीन शाह आफ्रिदीला षटकार खेचला 1.1 ओव्हरमध्ये ससेक्सची स्थिती 6/2 अशी होती. संघ अडचणीत असताना चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी आला. शाहीन शाह आफ्रिदीने सलामीवीरांना स्वस्तात माघारी पाठवलं होतं.
तिसऱ्या ओव्हरमध्ये आफ्रिदीला सिक्स मारल्यानंतर पुजाराने पाकिस्तानी गोलंदाजाला आणखी एक चौकार ठोकला. 67 चेंडूत त्याने 50 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने आक्रमक फलंदाजी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ पूर्ण होण्याआधी त्याने शतक ठोकलं.
पुजारा 149 चेंडूत 125 धावांवर नाबाद आहे. टॉम क्लार्कसोबत तो फलंदाजी करतोय. पहिल्या इनिंगमध्ये ससेक्सचा डाव 392 धावात आटोपला होता. मिडलसेक्सने पहिल्या डावात 358 धावा केल्या होत्या. फक्त आता एकादिवसाचा खेळ शिल्लक आहे. आज हा सामना ड्रॉ होऊ शकतो.
Upper cut six from Cheteshwar Pujara to Shaheen Afridi #CountyCricket2022 pic.twitter.com/NkTke7oYE4
— MANISH (@KuntasticAguero) May 7, 2022
पूजारा त्याची चौथी काऊंटी मॅच खेळतोय. त्याने आधीच दोन द्विशतक ठोकली आहेत. मागच्या महिन्यात त्याने ससेक्ससाठी डेब्यु केला होता. त्या मॅचमध्ये पुजाराने 201 धावांची खेळी करताना डर्बीशायर विरुद्धची मॅड ड्रॉ करण्यात संघाला मदत केली होती. दुसऱ्या सामन्यात त्याने 109 आणि 12 धावांची खेळी केली. पण वॉरसेस्टशायर विरुद्ध पराभव टाळता आला नाही. तिसऱ्या सामन्यात ससेक्ससाठी त्याने पुन्हा द्विशतक झळकावलं. डरहॅम विरुद्ध त्याने 334 चेंडूत 203 धावा केल्या.