बिग क्रिकेट लीग 2024 स्पर्धेत क्रिकेटमधील एका चमत्कार क्रीडाप्रेमींना पाहता आला. या सामन्यात एमपी टायगर्स आणि युपी ब्रीज स्टार्स हे संघ आमनेसामने आले होते. युपी ब्रीज स्टार्स संघाचा कर्णधार चिराग गांधी याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या संधीचा एमपी टायगर्स संघाने फायदा घेतला. साकेत शर्मा आणि वन नेगी यांनी दमदार फलंदाजी केली. संघाच्या 65 धावा असताना नमन ओझा बाद झाला. नमन ओझा 26 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार मारून बाद झाला. त्यानंतर साकेत शर्मा आणि पवन नेगीने युपी ब्रीज स्टार्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. साकेत शर्माने 52 चेंडूत 16 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. तर पवन नेगीने 38 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 87 धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर एपी टायगर्सने 20 षटकात 239 धावांचं लक्ष ठेवलं होतं. हे लक्ष्य गाठण्यासाठी युपी ब्रीज स्टार्स संघ मैदानात उतरला.पण 20 षटकात 5 गडी गमवून 168 धावा करू शकला आणि 71 धावांनी पराभव झाला. पण एक चमत्कारीक घटना या धावांचा पाठलाग करताना घडली. 19 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हा प्रकार घडला.
युपी ब्रीज स्टार्सचा कर्णधार चिराग गांधी 98 धावांवर खेळत होता. समोर पवन नेगी षटक टाकत होता. त्याने टाकलेला तिसरा चेंडूने चिरागला चकवा दिला. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. क्लिन बोल्ड झाला आणि बेल्सही उडाली. पण बेल्स पुन्हा एकदा स्टंपवर अडकली त्यामुळे त्याला बाद दिलं नाही. ही चमत्कारीक घटना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. युपी ब्रीज स्टार्स असंही पराभवाच्या वेशीवर होती. असं असताना कर्णधार चिराग गांधीला शतक ठोकण्यास मदत झाली. त्याने 58 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 101 धावा ठोकल्या.
ONE OF THE CRAZIEST MOMENT IN CRICKET HISTORY 🤯
– Stumps rattled but bails didint came down. pic.twitter.com/sc4CQbwxQV
— Johns. (@CricCrazyJohns) December 17, 2024
एमपी टायगर्स : नमन ओझा(विकेटकीपर), साकेत शर्मा, पवन नेगी, युसूफ पठाण (कर्णधार), स्टूअर्ट बिनी, पीटर ट्रेगो, जतीन सक्सेना, अब्दुल बारी, फैझल ए, सॅम्युअल दास, संदीप कुमार
युपी ब्रीज स्टार्स : जितेंद्र सिंग, सामी अहमद खान, चिराग गांधी (विकेटकीपर/कर्णधार), असगर अफगान, राहात अग्रवाल, आर्यन प्रवीण कुमार, अपूर्वा मेहरोत्रा, इम्रान ताहीर, मोनू कुमार, नरेंद्र कुमार मीना, ईश्वर पांडे