मुंबई: वेस्ट इंडिजच्या (West indies) भूमीवर The 6ixty ही नवीन क्रिकेट लीग स्पर्धा सुरु झाली आहे. ख्रिस गेल या लीगचा सर्वात मोठा चेहरा आहे. या लीगचा पहिला सामना खेळण्याआधीच गेलने लांबलचक षटकार खेचण्याचा दावा केला आहे. गेल फक्त बोललाय, पण त्याच्याआधी एका फलंदाजाने प्रत्यक्षात हे करुन दाखवलय. या फलंदाजाच नाव आहे, क्लो ट्रायॉन. दक्षिण आफ्रिकेच्या या महिला फलंदाजाने The 6ixty मध्ये एक कडक सिक्स मारला. महिला संघांमध्ये सामना सुरु होता. क्लो ट्रायॉन (chloe tyron) इतका लांबलचक सिक्स मारला की, चेंडू फक्त सीमारेषाच नाही, तर चेंडू स्टेडियमच्या छपरावर जाऊन हरवला. म्हणजे गेलच्या आधी क्लो ट्रायॉनने The 6ixty मध्ये रंगत भरली. बारबाडोस रॉयल्स आणि गुयाना अमेजॉन मध्ये सामना होता. बारबाडोसने प्रथम फलंदाजी करताना 58 धावा बनवल्या. प्रत्युत्तरात गुयाना अमेजॉनने 1 विकेट गमावून 59 धावांचे विजयी लक्ष्य गाठले. गुयानाने हा सामना 12 चेंडू आणि 5 विकेट राखून जिंकला.
क्लो ट्रायॉन बारबाडोस रॉयल्सकडून खेळत होती. त्यांचा संघ हरला पण क्लो ट्रायॉनने सर्वांच मन जिंकून घेतलं. तिने मारलेल्या एका कडक सिक्सची जोरदार चर्चा आहे. क्लो ट्रायॉन आपल्या संघाची सर्वात यशस्वी फलंदाज ठरली. ती अशी एकमेव फलंदाज आहे, जी दोन आकडी धावसंख्या गाठू शकली. तिने 17 चेंडूत 24 धावा फटकावल्या. या दरम्यान मारलेल्या एका षटकाराची जोरदार चर्चा आहे.
Chloe Tyron goes big with the @officialskyexch play of the match #6ixtycricket #cricketspowergame #BRvTKR pic.twitter.com/CbMcxpVAIk
— THE 6IXTY (@6ixtycricket) August 24, 2022
क्लो ट्रायॉन 86 मीटर लांब सिक्स मारला. चेंडू थेट स्टेडियमच्या छपरावर जाऊन पडला. तिथून तो चेंडू आणणं सोपं नव्हतं. एका प्रकारे तिने आपल्या षटकाराने चेंडूच हरवून टाकला. The 6IXTY मध्ये आजपासून पुरुषांचे सामने सुरु होणार आहेत. आज गेलच्या बॅटमधूनही असेच कडक सिक्स बघायला मिळू शकतात.