मुंबई: सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच सक्रीय असणारी आणि कोरियोग्राफर धनश्री वर्मा (Dhanshree verma) अचानक चर्चेत आली आहे. धनश्री वर्मा भारतीय गोलंदाज युजवेंद्र चहलची (Yuzvendra chahal) पत्नी आहे. धनश्री वर्मा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटमुळे चर्चेत आहे. तिने आपल्या नावामधून चहल नाव हटवलय. त्यानंतर दोघांच्या चाहत्यांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे. धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल ही लोकप्रिय जोडी विभक्त तर होणार नाही ना? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. लग्नानंतर धनश्री वर्माने तिच्या नावाच्या पुढे पती युजवेंद्र चहलच आडनाव लावलं होतं.
धनश्री वर्माने फॅन्सना धक्का देत आपल्या नावामधून चहल आडनाव काढून टाकलं आहे. तुम्ही तीचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिलं तर, युजरनेम मधून पती युजवेंद्रच आडनाव काढलय. आधी तिच इन्स्टाग्राम युजरनेम धनश्री वर्मा चहल असं होतं. लग्नानंतर तिने हे आडनाव लावलं होतं. दोघांमध्ये सर्व काही आलबेल आहे का? अशी चर्चा आता सुरु झालीय. धनश्री वर्माने आडनाव का हटवलं? त्या संदर्भात जास्त माहिती समोर आलेली नाही.
धनश्री वर्माने फक्त आडनाव हटवलय. पण फोटोज इन्स्टाग्रामवरुन डिलीट केलेले नाहीत. याच्या काही दिवस आधी चहलच्या एका पोस्टने चाहत्यांमध्ये उत्सुक्ता निर्माण केली होती. चहलने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली होती. त्यात त्याने एका नव्या आयुष्याची सुरुवात होत आहे, असं म्हटलं होतं.
Instagram story of Yuzi chahal ? pic.twitter.com/HjQSBraLCH
— Mufaddal Vohra (@mufaddol_vohra) August 16, 2022
दोघांमध्ये सर्व काही सुरळीत नाहीय, असं चहलच्या त्या पोस्टनंतर चाहत्यांना वाटलं होतं. अजूनपर्यंत या जोडप्याकडून काही स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माची पहिली भेट एका ऑनलाइन डान्स क्लास मध्ये झाली होती. चहलने डान्स शिकण्यासाठी धनश्रीच्या क्लास मध्ये प्रवेश घेतला होता. डान्स शिकताना, शिकवताना दोघांमध्ये प्रेमसंबंध बहरले. पुढे जाऊन दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.