Shoaib Malik | सध्या सोशल मीडियावर शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा आहे. शोएब मलिकने 2010 मध्ये भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झा बरोबर लग्न केलं होतं. दहा ते अकरा वर्षाच्या संसारानंतर शोएब मलिकने सानियाला घटस्फोट देऊन आता तिसर लग्न केलय. सना जावेद या पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत त्याने संसार थाटलाय. शोएब मलिकने हे जे पाऊल उचललय त्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. शोएब मलिकच हे तिसर लग्न त्याच्या कुटुंबीयांना सुद्धा मान्य नाहीय. पाकिस्तानात अनेकांनी त्याला यावरुन बरच काही सुनावलं आहे. शोएब मलिक आणि सानिया मिर्झामध्ये सर्व काही सुरळीत नाहीय. दोघे विभक्त होणार, याची मागच्या वर्षभरापासून चर्चा सुरु होती. अखेर शनिवारी ते घडलच. शोएबने अचानक त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट केले.
शोएब मलिक आणि सना जावेदच्या या लग्नावर प्रसिद्ध बांग्लादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी परखड शब्दात आपल मत मांडलं आहे. तस्लीमा नसरीन यांच्या लेखनावरुन आतापर्यंत बरेच वाद सुद्धा झाले आहेत. इस्लाममधील काही रुढी, परंपरांवर त्यांनी परखडपणे आपल मत मांडल होतं.
‘इस्लामवर विश्वास असेल, तर त्याला घटस्फोट घेण्याची सुद्धा गरज नाही’
“मला अस वाटत होतं की, शोएब मलिक-सानिया मिर्झा आनंदी जोडप आहे. पण मी चुकीची होते. सानिया मिर्झासारखी हुशार मुलगी, अशा खराब मुलासोबत कस लग्न करु शकते?. एक दिवस शोएब मलिक सना जावेदला सुद्धा घटस्फोट देईल आणि एक्स सोबत लग्न करेल. त्यानंतर X ला घटस्फोट देऊन Y सोबत, त्यानंतर Y ला घटस्फोट देऊन Z सोबत लग्न करेल. त्याचा इस्लामवर विश्वास असेल, तर त्याला घटस्फोट घेण्याची सुद्धा गरज नाही. एकाचवेळी तो 4 बायका सुद्धा ठेऊ शकतो” असं तस्लीमा नसरीन यांनी एक्सवर म्हटलं आहे.
सानियाच्या बहिणीने काय सांगितलं?
माझ्या मुलीने खुला पद्धतीने शोएब मलिकला घटस्फोट दिलाय असं सानिया मिर्झाचे वडिल म्हणाले. सानियाची बहिण अनम मिर्झाने मोहम्मद अझरुद्दीनच्या मुलासोबत लग्न केलय. काही महिन्यापूर्वी सानिया-शोएबचा घटस्फोट झाला होता, असं अनम मिर्झाने सांगितलं.