M S Dhoni: जगातील सर्वात यशस्वी यष्टीरक्षक (विकेटकीपर्स) म्हणून महेंद्रसिंह धोनी ओळखला जातो. धोनीच्या नावावर अनेक जागतिक विक्रम आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये धोनीच्या नावाचा डंका वाजत असतो. महेंद्रसिंह धोनी जेव्हा क्रिकेट मैदानावर स्टँपच्या मागे उभा असतो, तेव्हा विरोधी संघातील फलंदाज खूपच सतर्क असतात. धोनीने 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली होती. त्यानंतर धोनीने 2004 ते 2019 या काळात 538 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यात 829 जणांना बाद केले. तसेच 634 कॅच अन् 195 स्टंपिंग आहे. एकदिवसीय सामन्यात 123 स्टंपिंगचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे.
महेंद्रसिंह धोनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात धोनीने मजेशीर माहिती दिली आहे. ही माहिती त्याच्या आणि साक्षी दरम्यान झालेल्या वादाबाबत आहे. एकदा स्टंपिगवरुन धोनी आणि साक्षीत वाद झाला होता. तो किस्सा धोनीने शेअर केला आहे.
महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी एक क्रिकेट सामना पाहत होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. धोनी म्हणाला, आम्ही घरात एकदिवसीय सामना पाहत होता. त्यावेळी गोलंदाजाने वाइड बॉल टाकला. परंतु फलंदाजाला स्टपिंग करण्यात आले. मैदानातील अंपायरने थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवला. साक्षीने म्हटले, हा आऊट नाही. त्याचवेळी फलंदाज स्टेडियमकडे परत जाऊ लागला. तेव्हा साक्षी म्हणाली, त्या फलंदाजाला परत बोलवले जाईल. कारण वाइड चेंडूवर स्टंपिंग करता येत नाही.
धोनी पुढे म्हणतो, मी साक्षाला म्हणालो, वाइड बॉलवर स्टंपिंग केली जाते. परंतु नो बॉलवर होत नाही. त्यामुळे तो फलंदाज बाद आहे. त्यानंतर साक्षी म्हणते, तुम्हाला काहीच माहीत नाही. थोडावेळ वाट पाहा. थर्ड अंपायर त्या फलंदाजाला परत बोलवले. थोड्याच वेळेत थर्ड अंपायरने तो बाद असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर पुढचा फलंदाज फलंदाजीसाठी आला. त्यावेळी साक्षी पुन्हा म्हणते, ‘तुम्हें पता है कि कुछ गड़बड़ है.’ धोनी यांनी सांगितलेल्या या किस्सामुळे लोक चांगलेच हसू लागले.
That too during stumping 😂😂 https://t.co/L52s1co45n pic.twitter.com/ANSQCBJZNw
— shruti ✿ (@lostshruu) October 27, 2024
महेंद्रसिंग धोनीच्या स्टंपिंगचे आजही खूप कौतुक केले जाते. टीम इंडियाकडून खेळताना महेंद्रसिंग धोनीने सामन्याच्या अनेक नाजूक क्षणी आपल्या कौशल्याने विकेटकीपिंग केली. त्यामुळे अनेक सामन्यांचा निकालच बदलून टाकला होता. जागतिक क्रिकेटमधील महेंद्रसिंग धोनी एकमेव कर्णधार आहे ज्याच्या नेतृत्वात तीन मोठ्या आयसीसी ट्रॉफीवर भारतीय संघाचे नाव कोरले गेले. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ICC T20 विश्वचषक (2007), क्रिकेट विश्वचषक (2011) आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी (2013) चे विजेतेपद पटकावले आहेत. तसेच 2009 मध्ये भारत प्रथमच नंबर वन बनला.