लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या फायनलमध्ये चौथ्या दिवशी शुबमन गिलच्या विकेटवरुन मोठा वाद झाला. कॅमरुन ग्रीनने त्याची कॅच पकडली. कॅच घेतल्याच स्पष्ट दिसत नव्हतं. काही डाऊट होते. मात्र, तरीही अंपायर रिचर्ड केटलब्रॉ यांनी शुबमनला बाद दिलं. त्यांच्या या निर्णयावर भारतीय चाहते नाराज झाले. फॅन्सनी कॅमरुन ग्रीन आणि रिचर्ड केटलब्रॉ यांच्याविरोधात मोर्चा उघडला. रिचर्ड केटलब्रॉ यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय.
काही फॅन्सनी त्यांना डोळ्यांवर उपचार करुन घेण्याचा सल्ला दिलाय. रिचर्ड केटलब्रॉ आयसीसी टुर्नामेंटच्या नॉक आऊट मॅचेसमध्ये भारतासाठी नेहमीच पराभव घेऊन आलेत.
नेहमीच पराभव पदरी
रिचर्ड केटलब्रॉ यांनी जेव्हा-जेव्हा टीम इंडियाच्या नॉक आऊट मॅचमध्ये अंपायरींग केलीय, तेव्हा नेहमीच पराभव पदरी आलाय. त्यांनी एकदा-दोनदा नव्हे, तब्बल पाचवेळा भारताच्या नॉक आऊट मॅचमध्ये अंपायरींग केलीय. नेहमीच टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागलाय.
टीम इंडियासाठी अनलकी अंपायर
रिचर्ड केटलब्रॉ वर्ष 2014 मध्ये वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये अंपायर होते. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना गमावला. वर्ष 2015 मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये अंपायर होते. त्यावेळी सुद्धा टीम इंडिया हरली. 2016 टी 20 वर्ल्ड कप सेमीफायनल, 2017 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये सुद्धा हेच झालं. 2019 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडिया पराभूत झाली. 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये केटलब्रॉ थर्ड अंपायर आहेत. त्यांच्या एका निर्णयाचा टीम इंडियाला मोठा फटका बसलाय.
क्रिकेटर म्हणून कसा आहे परफॉर्मन्स?
रिचर्ड केटलब्रॉ इंग्लंडचे आहेत. त्यांनी फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए क्रिकेट खेळलय. रिचर्ड टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करायचे. त्यांनी यॉर्कशायर, मिडिलसेक्ससाठी क्रिकेट खेळलय. रिचर्ड केटलब्रॉ यांचं करीयर 1999 मध्ये सुरु झालं. 6 वर्षात त्यांच करीयर संपलं. केटलब्रॉ यांनी 33 फर्स्ट क्लास सामन्यात 25.16 च्या सरासरीने 1258 धावा केल्या आहेत. लिस्ट ए मध्ये 21 सामन्यात 290 धावा केल्यात.
Richard kettleborough showed his class yet again… As always… A hand folded request… Please keep him away from India matches in future ?? pic.twitter.com/1jyqwCDWge
— Xtreme Guy (@MachinesXtreme) June 10, 2023
सर्वात अनुभवी अंपायर
रिचर्ड केटलब्रॉ अनुभवी अंपायर आहेत. त्यांनी 109 टेस्ट मॅचमध्ये अंपायरींग केलीय. 145 वनडे आणि 51 T20 सामन्यात त्यांच्याकडे अंपायरींगचा अनुभव आहे.