नवी दिल्ली : इंग्लंड क्रिकेट टीमचा विद्यमान कॅप्टन जोस बटलर याची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. क्रिकेट विश्वात त्याच्या स्फोटक बॅटिंगचे अनेक चाहते आहेत. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने जबरदस्त बॅटिंग केली. त्याने थेट शतक ठोकलं. पाचव्या नंबरवर बॅटिंग करताना त्याने 127 चेंडूंचा सामना केला. 103.15 च्या स्ट्राइक रेटने 131 धावांची शतकी खेळी केली. या दरम्यान त्याने सहा चौकार आणि सात षटकार मारले. बटलर आणि मलानच्या जबरदस्त बॅटिंगमुळे इंग्लंडने तिसरा वनडे सामना 59 धावांनी जिंकला.
भारताच्या ‘या’ बॉलरची जोस बटलरवर दहशत
ESPN सोबत खास चर्चेमध्ये जोस बटलरने काही गोष्टींचा उलगडा केला. क्रिकेट विश्वात कुठल्या गोलंदाजाचा सामना करणं, सर्वात जास्त अडचणीच वाटतं, त्याबद्दल बटलरने सांगितलं. जोस बटलरवर एका भारतीय गोलंदाजाची दहशत आहे. त्याचं नाव आहे, जसप्रीत बुमराह. जोस बटलरच्या मते, जसप्रीत बुमराह क्रिकेट विश्वातील सर्वाधिक धोकादायक गोलंदाज आहे.
क्रिकेट करिअरमध्ये तुला कुठला बॉलर सर्वात जास्त वेगवान वाटला, असा प्रश्न बटलरला विचारण्यात आला. त्यावर त्याने जसप्रीत बुमराहच नाव घेतलं. T20 फॉर्मेटमध्ये बुमराहने चारवेळा बटलरची विकेट काढलीय.
5 नंबर खास
बटलर सध्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 131 धावा केल्या. वनडे करिअरमधील त्याचं हे 11 व शतक आहे. वनडे फॉर्मेटमध्ये पाचव्या नंबरवर किंवा त्यापेक्षा खाली येऊन, सेंच्युरी मारणारा बटलर क्रिकेट विश्वातील पहिला फलंदाज आहे. पाचवा नंबर किंवा त्यापेक्षा खाली येऊन त्याने एकूण आठ शतकं झळकवली आहेत.