IPL मधल्या 6 फ्रेंचायजींनी दक्षिण आफ्रिकेत विकत घेतले संघ, जाणून घ्या कोण, कुठल्या संघाचा मालक

| Updated on: Jul 21, 2022 | 10:36 AM

पुढच्यावर्षीपासून दक्षिण आफ्रिका क्रिकेट लीग (South Africa Cricket League) सुरु होणार आहे. या स्पर्धेत चाहत्यांना मिनी आयपीएल (IPL) पहायला मिळणार आहे.

IPL मधल्या 6 फ्रेंचायजींनी दक्षिण आफ्रिकेत विकत घेतले संघ, जाणून घ्या कोण, कुठल्या संघाचा मालक
csa
Follow us on

मुंबई: पुढच्यावर्षीपासून दक्षिण आफ्रिका क्रिकेट लीग (South Africa Cricket League) सुरु होणार आहे. या स्पर्धेत चाहत्यांना मिनी आयपीएल (IPL) पहायला मिळणार आहे. आयपीएल मध्ये मालकी हक्क असलेल्या कंपन्यांनी लीग मधील सर्वच्या सर्व सहा संघ विकत घेतले आहेत. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (CSA) बुधवारी ही माहिती दिली. जानेवारी महिन्यात या टी 20 लीगचे आयोजन होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथकडे या टी 20 लीगची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आयपीएल सारखीच दक्षिण आफ्रिका क्रिकेट लीग

  1. केपटाउनच्या संघाला रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडने विकत घेतलं आहे. रिलायन्सकडे आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आहे. मुंबईने पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे.
  2. डरबनच्या संघाला आरएसपीजी स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने विकत घेतलं आहे. याच कंपनीने मागच्यावर्षी विक्रमी बोली लावून लखनौचा संघ विकत घेतला होता. संजीव गोयंका ग्रुपने यासाठी 7090 कोटी रुपये खर्च केले.
  3. पोर्ट एलिजाबेथ संघाचे मालकी हक्क सन टीव्हीकडे आहेत. आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबादचे मालकी हक्क सुद्धा सन टीव्हीकडे आहेत.
  4. जोहान्सबर्गच्या संघाला चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेडने विकत घेतलं आहे. इंडिया सीमेंट्सने 2008 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सचा संघ विकत घेतला होता. आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट लीग मध्येही इंडिया सीमेंट्सने संघ विकत घेतलाय.
  5. पार्लचा संघ रॉयल स्पोर्ट्स ग्रुपने विकत घेतलाय. राजस्थान रॉयल्सची मालकी रॉयल स्पोर्ट्स ग्रुपकडे आहे. रॉयल्स ग्रुप मध्ये चार वेगवेगळ्या कंपन्यांचे शेयर्स आहेत. यात फॉक्स आणि डाबरही आहे. यंदाच्या सीजन मध्ये तब्बल 14 वर्षानंतर राजस्थानचा संघ फायनल मध्ये पोहोचला होता.
  6. दिल्लीच्या संघातील सहमालक जेएसडब्ल्यूने प्रेटोरियाचा संघ विकत घेतला आहे. भारतात JSW खेळांच्या बाबतीत एक मोठी कंपनी आहे. अनेक खेळाडूंना ही कंपनी स्पॉन्सर करते. आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट लीग मध्ये JSW चा संघ दिसेल.

अन्य लीगच्या टीम मध्येही भारतीय कंपन्यांचे शेयर्स

दक्षिण आफ्रिका लीगच्या आधी सुद्धा भारतीय कंपन्यांनी अन्य क्रिकेट लीग मध्ये गुंतवणूक केली आहे. जगात अशा अनेक लीग आहेत, जिथे संघ मालक भारतीय आहेत. कोलकाता नाइट रायडर्य संघाची मालिका रेड चिलीज आणि जय मेहताच्या नाइडर्स ग्रुपकडे आहे. त्यांनी वेस्ट इंडिज मधल्या कॅरेबियाई प्रीमियर लीग मधील त्रिनबागो नाइट रायडर्सचा संघ विकत घेतला होता. यूएई लीग मध्ये सुद्धा शाहरुख खानची अबुधाबी नाइट रायडर्सची टीम आहे. यूएई टी 20 लीग मध्ये अदानी ग्रुपने सुद्धा एका टी 20 संघात हिस्सा विकत घेतला आहे.