मुंबई: भारतीय महिला क्रिकेट टीमने मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन मालिका विजय मिळवला. इंग्लिश टीमला त्यांच्या घरातच धूळ चारली. महत्त्वाच म्हणजे महिला टीम इंडियाने संपूर्ण सीरीजमध्ये वर्चस्व गाजवलं. महिला टीमने क्लीन स्वीप विजयाची नोंद केली. त्यांनी 3-0 ने इंग्लंडच्या महिला टीमला पराभूत केलं. सीरीजमध्ये क्लीन स्वीप विजय मिळवून दिग्गज गोलंदाज झूलन गोस्वामीला आठवणीत राहिलं असा निरोप दिला.
कॅप्टन भावूक झाली
झूलनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट करीयरमधील हा शेवटचा सामना होता. यावेळी कॅप्टन हरमनप्रीत कौर भावूक झाली होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. सीरीजमधला तिसरा सामना जिंकल्यानंतर भारतीय टीमने एक स्पेशल काम केलं. त्यानंतर लोकांना दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची आठवण आली.
दोन दशकं टीम इंडियाच प्रतिनिधीत्व
39 वर्षीय झूलन गोस्वामीने तब्बल दोन दशकं भारतीय महिला टीमच प्रतिनिधीत्व केलं. इतक्या दीर्घ क्रिकेट करीयरचा शेवट तिने ऐतिहासिक लॉर्डसच्या मैदानात केला. लॉर्डसच्या मैदानात झूलनला निरोप देण्यात आला.
झूलनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
इंग्लंडला तिसऱ्या वनडेमध्ये 16 धावांनी हरवलं. त्यानंतर मेघना सिंहने झूलनला खांद्यावर उचलून घेतलं. त्यानंतर सर्वच खेळाडूंनी मैदानावर एक फेरी मारली. त्यावेळी झूलनच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तिने हात उंचावून प्रेक्षकांच अभिवादन स्वीकारलं. झूलनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Meghna Singh carrying Jhulan Goswami on her shoulders who carried the country’s hopes on her shoulders for the last 20 years!
(?: @ReemaMalhotra8) @JhulanG10 | #ThankYouJhulan | #ENGvIND pic.twitter.com/cvHX0nK4BJ
— Women’s CricZone (@WomensCricZone) September 24, 2022
सचिनला वर्ल्ड कपमध्ये ‘लेप ऑफ ऑनर’
टीम इंडियाने 2011 साली वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेला हरवलं होतं. त्यावेळी भारतीय टीममधील खेळाडूंनी सचिन तेंडुलकरला खांद्यावर बसवून मैदानात फेरी मारली होती. कारण मास्टर-ब्लास्टरचा हा शेवटचा वर्ल्ड कप आहे, हे सर्वांना माहित होतं. सचिनच्या आयुष्यात यापेक्षा जास्त आनंदाचा क्षण असू शकत नाही. सचिनसाठी ही मूमेंट खूप खास होती. त्यामुळे टीम इंडियाने अशा पद्धतीने सेलिब्रेशन केलं होतं.