मुंबई : क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना षटकाराला सर्वाधिक महत्त्व असतं. एक षटकारही सामना फिरवू शकतो. अशावेळी एका ओव्हरणध्ये सहा षटकार म्हणजे अगदी शेवटच. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2007 सालच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सने नेदरलँड्स संघाविरुद्ध सहा षटकार ठोकले होते. त्यानंतर भारताचा सिक्सर किंग युवराजने त्याच वर्षी टी-20 विश्वचषकात इंग्लंडच्या स्टुवर्ट ब्रॉडला सहा षटकार ठोकले होते. आता आणखी एका भारतीयाने ही कामगिरी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सहा षटकार ठोकले आहेत. पण हा भारतीय भारतासाठी नाही तर अमेरिका संघासाठी खेळत असून त्याचं नाव आहे जसकरण मल्होत्रा (Jaskaran Malhotra).
भारतातील चंदीगड शहरात जन्मलेला 32 वर्षीय जसकरणने अमेरिका संघाकडून यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळतो. त्याने गुरुवारी 9 (सप्टेंबर) पापुआ न्यू गिनी (PNG) संघाविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एका षटकात सहा षटकार ठोकत कारनामा केला. यासोबतच त्याने आपलं नाव गिब्ज, युवराज या दिग्गजांच्या यादीत सामिल केलं आहे. एकदिवसीय सामन्यात ही कामगिरी करणारा तो गिब्जनंतर पहिलाच खेळाडू ठरला आहे. सामन्यात जसकरणने 124 चेंडूत 173 धावा केल्या. ज्यात 16 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे अमेरिकेचा एकही खेळाडू 22 हून अधिक धावा करु शकला नसताना जसकरणने ही अप्रतिम कामगिरी केली. आयसीसीने जसकरणचा हा व्हिडीओ पोस्ट करत त्याच अभिनंदन केलं आहे.
? CARNAGE ?
6 6 6 6 6 6
Watch Jaskaran Malhotra creating history as he hit six sixes in an over against PNG!
Credit ?️ @usacricket pic.twitter.com/go20e85J91
— ICC (@ICC) September 10, 2021
सामन्यात अमेरिका संघाची प्रथम फलंदाजी होती. यावेळी अमेरिकेकडून जसकरणने पापुआ न्यू गिनी संघाविरुद्ध केलेल्या कामगिरीमुळे सर्वत्र त्याच्या नावाची चर्चा आहे. सामन्यात जसकरणच्या 173 धावांच्या जोरावर अमेरिकेने 9 विकेटच्या बदल्यात 271 धावा केल्या. ज्यानंतर पीएनजीचा संघ मात्र 134 धावांवर सर्वबाद झाला. ज्यामुळे अमेरिकेने सामना जिंकत मालिकेतही 2-0 ची आघाडी घेतली आहे.
इतर बातम्या
T 20 World Cup मध्ये धोनी विरुद्ध रवी शास्त्री वाद रंगला तर?, माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली भिती
(Cricketer Jaskaran Malhotra created history as he hit six sixes in an over against PNG for America)