मुंबई : सध्या टी-20 क्रिकेटमधील धाकड फलंदाज कायरन पोलार्ड (Kieron Pollard) जगभरातील बहुतेक लीगमध्ये खेळत असतो. इंडियन प्रिमियर लीगच्या (IPL 2021) मुंबई इंडियन्स संघाचा उप कर्णधार असणारा पोलार्ड सध्या कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये (Caribbean Premier league) खेळत आहे. फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी करणारा पोलार्ड त्याच्या आक्रमक अंदाजासाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. शक्यतो पोलार्डचे तुफान फलंदाजीचे किंवा क्षेत्ररक्षणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण सध्या पोलार्डचा मैदानावर पंचाच्या निर्णयाचा निषेध करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सीपीएलमध्ये त्रिनिबागो नाइट रायडर्स आणि सेंट लूसिया किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात पोलार्ड पंचाच्या एका निर्णयावर रागवून मैदानातच विरोध दर्शवू लागला. सीपीएलमध्ये पोलार्ड नाइट रायडर्संधून खेळतो. यावेळी त्यांची फलंदाजी सुरु होती. त्यावेळी नाइट रायडर्सचे खेळाडू 19 वी ओव्हर खेळत होते. वहाब रियाज गोंलंदाजी करत असताना समोर फलंदाजीला टिम सेइफर्ट तर नॉन स्ट्रा्ईकवर पोलार्ड होता. त्याचवेळी रियाजने एक अत्यंत वाईड स्टम्पापासून दूर चेंडू फेकला. चेंडू मारण्याच्या नादात टीम अक्षरश: खाली पडला. पण तरी देखील पंचानी चेंडू वाई़ड घोषित केला नाही. दरम्यान यावेळी पंचाच्या वाईड न देण्याच्या निर्णयाने पोलार्ड रागवला आणि काही न बोलता नॉन स्ट्राईक फलंदाज उभा राहतो तिथून फार दूर जाऊन थांबला. या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
Just Kieron Pollard things ?#CPL21 #KieronPollard #TKRvSLK #Pollard pic.twitter.com/PtY16EMAmN
— Satyam Shekhar (@satyamshekhar_) August 31, 2021
सामन्यात पोलार्डच्या नाइट रायडर्स संघाने विजय मिळवला. त्यांनी प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 विकेटच्या बदल्यात 158 धावा केल्या. पोलार्डने 29 चेंडूत 41 धावा केल्या. यावेळी त्याने सहा चौकार आणि एक षटकार खेचला. किंग्सचा संघ या लक्ष्याचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये सात विकेटच्या बदल्यात 131 धावाच करु शकला. ज्यामुळे नाईट रायडर्सचा संघ विजयी झाला.
हे ही वाचा
भारतीय संघाकडून सलामीचा सामना, मग पाकिस्तान संघातून खेळला, भारताला पराभूत करण्यातही मोठा वाटा
(Cricketer Kieron pollard got angry and protested against umpire decision in cpl match)