मुंबई: विराट कोहली (Virat kohli) मुंबईत हॉटेल बिझनेस (Hotel Business) मध्ये उतरणार आहे. लवकरच विराटच्या मालकीच रेस्टॉरंट मुंबईत सुरु होणार आहे. यासाठी विराटने एक जागा सुद्धा भाड्यावर घेतली आहे. विराट कोहली एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या बंगल्यात आपलं रेस्टॉरंट उघडणार आहे. विराटला ही जागा प्रचंड आवडली आहे. विराट कोहलीच हे रेस्टॉरंट जुहू मध्ये असणार आहे. त्यासाठी विराटने प्रसिद्ध गायक, अभिनेते किशोर कुमार (Kishore kumar) यांच्या बंगल्याचा मोठा भाग भाड्यावर घेतला आहे. येथे एका हाय ग्रेड रेस्टॉरंटच काम चालू आहे. जुहू मध्ये किशोर कुमार यांचा बंगला आहे. तिथे सध्या दररोज काम सुरु आहे. एका ऑनलाइन पोर्टलने हे वृत्त दिलं आहे. विराट कोहलीच हे नवीन रेस्टॉरंट जवळपास बनून तयार झालं आहे.
विराट कोहली पुढच्या महिन्यात कधीही हे रेस्टॉरंट सुरु करु शकतो, अशी माहिती आहे. अमित कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लीना चंदावरकर यांचा मुलगा सुमीत काही महिन्यांपूर्वी विराट कोहलीला भेटला. दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याचा निर्णय झाला. आम्ही 5 वर्षांसाठी विराट कोहलीला ही जागा भाडेतत्त्वावर दिली आहे, असं अमित कुमार म्हणाले.
विराट कोहलीच हे पहिलं रेस्टॉरंट नाहीय. देशातील अनेक भागात त्याची रेस्टॉरंट्स आहेत. 2017 साली दिल्लीच्या आरके पुरम मध्ये त्यांने Nueva नावाचं रेस्टॉरंट सुरु केलं होतं. त्याशिवाय दिल्लीतच विराटच One8commune नावाचं रेस्टॉरंट आहे.
विराट कोहलीने काल हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकवलं. पण त्याआधी तो बराच काळ खराब फॉर्म मध्ये होता. अजूनही विराट कोहलीला सूर गवसलाय असं म्हणता येणार नाही. विराट कोहलीची एक इमेज आहे. सोशल मीडियावर त्याची मोठी फॅन फॉलोइंग आहे. क्रिकेटर म्हणून विराट कोहली पैसा कमावतोच आहे. पण हॉटेल मालक म्हणूनही खोऱ्याने कमाई सुरु आहे. त्याशिवाय विराटचा स्वत:चा कपड्यांचा एक ब्रँड आहे. WROGN त्याचं नाव आहे. त्याचा हा ब्रँड सुद्धा फेमस आहे.