मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) आधी चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आपला चॅम्पियन फलंदाज फाफ डुप्लेसीची (faf du plessis) साथ सोडली होती. डुप्लेसी 15 व्या सीजन मध्ये आरसीबीचा कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबीची टीम प्लेऑफ पर्यंत पोहोचली. पण आता पुन्हा एकदा फाफ डुप्लेसीच चेन्नई सुपरकिंग्स मध्ये पुनरागमन झालय. तुम्हाला आश्चर्य वाटेल हे कसं शक्य आहे? पण चेन्नई सुपर किंग्स मॅनेजमेंटने आयपीएल नाही, तर सीएसए टी 20 लीगसाठी डुप्लेसी सोबत करार केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डुप्लेसीला चेन्नई सुपरकिंग्स मॅनेजमेंटने आपला मार्की खेळाडू बनवलं आहे. पुढच्यावर्षी पासून क्रिकेट दक्षिण आफ्रिकेची टी 20 लीग सुरु होत आहे. या लीग मधील सर्व 6 संघांचे मालकी हक्क आयपीएल संघांकडे आहेत.
सीएसए टी 20 लीग मध्ये मुंबई इंडियन्सनेही एक मोठ पाऊल उचललं आहे. राशिद खानला आपल्या संघासोबत जोडलं आहे. मुंबईने आणखी तीन खेळाडूंना आपल्या टीमसोबत जोडलं आहे. मुंबई इंडियन्सने लियाम लिव्हिंगस्टोन, कागिसो रबाडा आणि सॅम करनचा स्क्वाड मध्ये समावेश केलाय.
दिल्ली कॅपिटल्सने एनरिक नॉर्खियाला आपला मार्की खेळाडू बनवलं आहे. सनरायजर्स हैदराबादने एडेन मार्करमला आपला मार्की खेळाडू बनवलं आहे. राजस्थान रॉयल्सने जोस बटलर आणि लखनऊ सुपर जायंट्सने डी कॉकची मार्की खेळाडू म्हणून निवड केली आहे.
सीएसए टी 20 लीग मध्ये प्रत्येक संघाला जास्तीत जास्त पाच खेळाडूंना निवडण्याचा पर्याय होता. आता अन्य खेळाडूंना ऑक्शन मध्ये विकत घेतलं जाईल. प्रत्येक संघाला 10 दक्षिण आफ्रिकन आणि 7 परदेशी खेळाडू निवडावे लागतील. प्लेइंग इलेव्हन मध्ये 7 दक्षिण आफ्रिकन आणि 4 परदेशी खेळाडू असतील.