मुंबई : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा इंडियन प्रीमियर लीगचा (Indian premier league) 14 वा सीजन कोरोनाच्या संकटामुळे मे महिन्यात मध्येच थांबवण्यात आला होता. आता 19 सप्टेंबरपासून उर्वरीत हंगामाला पुन्हा सुरुवात होणार असून स्पर्धेची तयारी जोरदार स्वरुपात सुरु झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे उर्वरीत स्पर्धा युएईत होणार आहे. तीन वेळा विजयी झालेला संघ चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सर्वात आधी युएईत पोहोचत सरावाला सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ देखील युएईत पोहोचला असून इतर संघाचे देखील काही खेळाडू युएईमध्ये पोहोचले आहेत. सध्या पुन्हा सर्वत्र आयपीएलचे वारे वाहू लागले असताना आयपीएलने उर्वरीत आयपीएला उद्देशून एक धांसू गाणं काढलं असून यामध्ये कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) रॉकस्टार होऊन नाचताना दिसत आहे.
आयपीएलने त्याच्या अधिकृत ट्विटरवर हा म्यूजिक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये धोनी अगदी रंगीबेरंगी कपडे घालून नाचत आहे. धोनीची हेयरस्टायल देखील अगदी वेगळी आहे. केसांनाही त्याने रंग दिला असून तो एका चाळीत डान्स करताना दिसत आहे. याठिकाणी उर्वरीत आयपीएलच्या सीजनबद्दल तो गाण्यातून सांगत असून अखेरीस ‘पहला हाफ तो सिर्फ झांकी था आयपीएल के दूसरे हाफ की पिक्चर अभी बाकी है” असं म्हणत प्रेक्षकांची उत्कंठा आणखी शिगेला पोहचवत आहे.
??? – #VIVOIPL 2021 is BACK and ready to hit your screens once again!
Time to find out how this blockbuster season concludes, ‘coz #AsliPictureAbhiBaakiHai!
Starts Sep 19 | @StarSportsIndia & @DisneyPlusHS pic.twitter.com/4D8p7nxlJL
— IndianPremierLeague (@IPL) August 20, 2021
मे महिन्याच्या सुरुवातीला आयपीएलमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने 3 मे रोजीचा RCB विरुद्ध KKR हा सामना रद्द झाला होता. त्यानंतर 4 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे IPL ची स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय BCCI ने 4 मे रोजी घेतला होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी उर्वरीत आयपीएल युएईत घेणार असल्याची माहिती दिली होती. ज्यानंतर आणखी काही दिवसांनी आयपीएलची तारीख आणि वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं.
19 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
20 सप्टेंबर – कोलकाता नाइट रायडर्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
21 सप्टेंबर – पंजाब किंग्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
22 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
23 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
24 सप्टेंबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शाहजाह
25 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स VS राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी
25 सप्टेंबर – सनयारझर्स हैदराबाद VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शाहजाह
26 सप्टेंबर – चेन्नई सुपर किंग्स VS कोलकाता नाईट रायडर्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी
26 सप्टेंबर – पंजाब किंग्स VS मुंबई इंडियन्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
27 सप्टेंबर- सनरायझर्स हैदराबाद VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
28 सप्टेंबर – कोलकाता नाइट रायडर्स VS दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह
28 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
29 सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
30 सप्टेंबर – सनरायझर्स हैदराबाद VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
1 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
2 ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स VS दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह
2 ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
3 ऑक्टोबर – पंजाब किंग्स VS रॉयल चँलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह
3 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
4 ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
5 ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
6 ऑक्टोबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
7 ऑक्टोबर – चेन्नई सुपर किंग्स VS पंजाब किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – दुबई
7 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
8 ऑक्टोबर – सनरायझर्स हैदराबाद VS मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी
8 ऑक्टोबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
10 ऑक्टोबर – क्वालिफायर, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
11 ऑक्टोबर – एलिमिनेटर, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
13 ऑक्टोबर – क्वालिफायर 2, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
15 ऑक्टोबर- अंतिम सामना, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
इतर बातम्या
तब्बल 65 दिवसांनी पत्नीला भेटल्यानंतर सूर्यकुमार खुश, VIDEO शेअर करत व्यक्त केला आनंद
Video: उडे जब जब झुल्फें तेरी, पोरींचा घोळका झूम मिटींगवरच नीरज चोप्रासमोर नाचायला लागला
गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या आवडी-निवडी, आवडता डायलॉग आणि अभिनेत्याबद्दल बोलताना म्हणाला..
(CSK captain Mahendra singh dhoni in IPL phase 2 new theme song became rockstar)