नवी दिल्ली : एमएस धोनी कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. पण काहीवेळा त्याचा संयम सुटतो. IPL मध्ये धोनी भडकल्याची अनेक उदहारण आहेत. दिल्लीमध्ये 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात सुद्धा असच झालं. तिथे धोनी अंपायरला नडला. धोनी आणि अंपायरमध्ये कशावरुन वाद झाला? हा प्रश्न आहे. त्यांच्यामधील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
मॅच दरम्यान धोनीचा मूड चांगला वाटत नव्हता. खासकरुन CSK ची गोलंदाजी सुरु असताना धोनीचा मूड चांगला नव्हता. धोनी आपल्या गोलंदाजांना सतत काही सांगत होता. त्यांना ओरडत होता. या दरम्यान धोनीचा फिल्ड अंपायर ख्रिस गैफनी यांच्याबरोबर वाद झाला.
वाद कशावरुन झाला?
नेमका वाद कशावरुन झाला, ते समजून घ्या. दिल्लीच्या इनिंगमधील 14 वी ओव्हर संपल्यानंतर हा सर्व वाद झाला. स्ट्रॅटजिक टाइम आऊट सुरु होता. या दरम्यान धोनीने अंपायरकडे चेंडू बदलण्याची मागणी केली. कारण चेंडूचा शेप खराब झाला होता. अंपायरनी CSK च्या कॅप्टनच म्हणण ऐकून चेंडू बदलला. अंपायर्सनी जो दुसरा चेंडू दिला, त्यावर धोनी खूश नव्हता.
— YA (@YAndyRRSick) May 20, 2023
धोनीच काय म्हणणं होतं?
याच मुद्यावरुन धोनी आणि अंपायर ख्रिस गैफनी यांच्यात वाद सुरु झाला. धोनी चेंडूवर नाराज असल्याच व्हिडिओमध्ये दिसतय. कारण तो चेंडू अंपायरला दाखवत होता. दुसरा चेंडू जो अंपायरने दिला, तो नवीन वाटत होता. धोनीला जुना चेंडू हवा होता. जितका जुना चेंडू त्याने अंपायर्सकडे दिलेला, तसाच चेंडू धोनीला अपेक्षित होता.
याआधी IPL 2019 मध्ये झालेला वाद
धोनी आणि अंपायरमध्ये वाद होण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी IPL 2019 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यामध्येही धोनीने अंपायर बरोबर हुज्जत घातली होती. त्यावेळी नो बॉल न देण्यावरुन धोनीने अंपायर बरोबर वाद घातलेला.