मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS dhoni) सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये व्यस्त आहे. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही धोनीच्या खेळातली जादू अजूनही कायम आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात धोनीने त्याच्यात अजूनही क्रिकेट शिल्लक असल्याचं दाखवून दिलं. शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 17 धावांची आवश्यकता होती. धोनी खेळपट्टीवर होता. जयदेव उनाडकट शेवटच षटक टाकत होता. त्याने शेवटच्या चेंडूवर चौकार मारुन चेन्नईला (CSK) यंदाच्या सीजनमधला दुसरा रोमांचक विजय मिळवून दिला. धोनीच्या आयपीएलमधल्या कामगिरीचं कौतुक होत आहे. धोनी आयपीएलमध्ये व्यस्त आहे. म्हणून धोनीचं त्याच्या बिझनेसकडे दुर्लक्ष झालेलं नाही. आयपीएलमध्ये खेळत असला, तरी धोनी त्याच्या बिझनेसवरही लक्ष ठेवून आहे.
धोनी मूळचा झारखंडचा आहे. रांचीमध्ये त्याची स्वत:ची शेती आहे. धोनीचा कोंबडी पालनाचाही व्यवयास आहे. धोनीने मागच्यावर्षी झाबुआच्या एका फार्मला 2 हजार कडकनाथ कोंबड्यांच्या पिल्लाची ऑर्डर दिली होती. कोरोना आणि बर्ड फ्लूमुळे ही ऑर्डर रोखून ठेवली होती. पण आता धोनीच्या फार्मला कडकनाथ कोंबडीच्या पिल्लांची डिलिव्हरी पोहोचवण्यात आली आहे.
मागच्यावर्षी धोनीने मध्य प्रदेशच्या झाबुआ मधील आशिष कडकनाथ सहकारी समितीला ऑर्डर दिली होती. धोनीच्या रिचा फार्मला ही ऑर्डर पोहोचवण्यात येईल, असे विनोद मैडा यांनी सांगितलं. कडकनाथ कोंबडीच्या पिल्लांबरोबर आशिष कडकनाथ सहकारी समितीकडून धोनीला एक विशेष गिफ्ट पाठवण्यात आलं आहे. दुसऱ्या कोंबड्याच्या तुलनेत कडकनाथ कोंबडीची अंडी आणि मांस महाग आहे.