मुंबई : आयपीएल 2022च्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील 17 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने हैदराबादला 155 धावांचं लक्ष्य दिलंय. आता हे सगळं असलं तरी सध्या ऋतुराज गायकवाडची चांगलीच चर्चा आहे. ऋतुराजने असं नेमकं काय केलंय की त्याची चर्चा होतेय. ते जाणून घ्याण्यापूर्वी चेन्नईनं नेमके किती रन काढले आहे आणि कोणत्या खेळाडूने कशी कामगिरी केली आहे. ते आधी जाणून घेऊया. पंधराव्या सीजनमदील सतराव्या सामन्यात सीजनमधील पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या चेन्नईने (CSK) हैदराबादच्या (SRH) विरुद्ध सुरुवात तर चांगली केली. मात्र, त्यांना आणखी चांगले रन बनवता आले असते. पण, तसं चेन्नईच्या संघाला जमलं नाही. रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड हे चांगले खेळत होते. पण त्यांना चांगले रन नाही काढता आले. त्यानंतर रायडू आणि मोईन अली यांनी संघासाठी चांगली खेळू करुन रन बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही त्यांना फारस यश आल्याचं दिसलं नाही. या सामन्यात महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा हरल्याचं दिसून आलं. त्यापूर्वी शिवम दुबे याने तीन रन बनवले आणि तोही आऊट झाला. तर शेवटच्या ओवरमध्ये रवींद्र जडेजाच्या तुफान फलंदाजीने चेन्नईला दीडशेच्या जवळपास रन बनवता आले.
चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये आज सामना खेळवला जातोय. हे दोन्ही संघ आतापर्यंत एकही सामना जिंकू शकलेले नाहीयेत. सनरायझर्स हैदराबाद दोन तर चेन्नई सुपर किंग्जला आतापर्यंत तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघप प्रयत्न करणार आहेत. मात्र फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. चेन्नईचा ऋतुराज गायकवाड अवघ्या 16 धावांवर बाद झाला असून नटराजनने चांगली कामगिरी केली आहे.
Bamboozled! T Natarajan’s dream delivery to dismiss Ruturaj Gaikwad. He did what he is known for.#CSKvSRH #CSKvsSRH #SRHvsCSK #IPL2022 pic.twitter.com/YIPUQFAL6b
— Mohit Pandey (@mohitherapy) April 9, 2022
चेन्नईचे सलामीवीर रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड फलंदाजीसाठी मैदानात उतरले. हे दोन्ही खेळाडू मैदानावर आपली जादू दाखवू शकले नाहीत. उथप्पा 11 धावा केल्या त्यानंतर तो आऊट झाला. ऋतुराज त्याच्या धडाकेबाज फलंदाजीनं चेन्नईला मोठा आधार देईल असं वाटलं होतं. मात्र तो फार काळ टिकू शकला नाही. फक्त सोळा धावा त्याने केल्या. नटराजनच्या बॉलला ऋतुराज घाबल्याचं दिसून आलं. अखेर तो आऊट झाला. तर दुसरीकडे रायडू 27 वांवर आऊट झाला. शिवम दुबे हा फक्त तीन धावा करुन परतला. धोनीने ही तीन धावा केल्या आणि आऊट झाला.
इतर बातम्या
Gunratna Sadavarte: सदावर्तेंना पोलीस कोठडी का दिली?, वकील वासवानी यांनी सांगितलं कोर्टात काय घडलं?
Gunratna Sadavarte : ‘…त्याचा बदला घेण्यासाठी ही अटक करण्यात आली’, सदावर्तेंच्या पत्नीचा थेट आरोप